‘दादर’ या मुंबईच्या प्रसिद्ध भागाचं नांव कसं आलं असावं हे जबरदस्त कुतुहल मला आहे..मुंबईतील बऱ्याच भागांच्या नांवाचा अर्थ शोधता येतो, मिळतोही. परंतू ‘दादर’चा अर्थ व ते नांव कसं अस्तित्वात आलं असावं याचा ठोस पुरावा काही मला मिळालेला नाही..
‘दादर’ नामजन्माचा शोध घेतला असता बऱ्याच ठिकाणी ‘दादर’ हे नांव जिना किंवा शिडी यावरून आलं असा उल्लेख सापडला..पण हे लाॅजीकली पटणं अवघड जातं..’दादर’ हा शब्द पूर्वी मध्य मुंबईतल्या लोकांच्या व गुजराती/पारशी लोकांच्या बोलण्यात जास्तं यायचा; अजुनही येतो. परंतू त्या ‘दादरा’चा, ‘दादर’ भागाशी काही संबंध असेल असं क्वचितही वाटत नाही..’दादर’ नांव कसं पडलं असावं यावर मी माझ्यापुरता एक अंदाज बांधला आहे तो तुमच्याशी शेअर करतो..
पोर्तगीज, इंग्रजांच्या काळात मुंबई ही सात बेटा-बेटांची होती या भुगोलाचा इतिहास भुगोल आपल्या सर्वांनाच माहित आहे.. परळ आणि माहिम यां दोन बेटांमध्ये खाडीचं राज्य होतं. या दोघांच्या मधल्या परिसरात भरती-ओहोटीनुसार पाणथळ जमीन, डबकी, चिखल, दलदल आदी असणं अगदी स्वाभाविक आहे..(शिवाय दादर ही अजुनही खोलगट जागा आहे हे दर पावसाळ्यात आपल्याला नव्याने समजते..खोल या अर्थाच्या दरा, दरी, दरार अशा शब्दांचं ‘दादर’शी जवळचं भौगोलीक नातं जाणवतं.) ..यातील ‘दलदल’ हा शब्द मला विशेष लक्ष देण्यासारखा वाटतो. ‘ल’ आणि ‘र’ ची अनेकदा अदलाबदल होत असताना दिसते..बोबडं बोलणाऱ्या व्यक्ती किंवा लहान मुल अनेकदा ‘र’च्या जागी ‘ल’ उच्चारतात..’ल’च्या जागी ‘र’ होणं तसं दुर्मिळ असलं तरी काही ठिकाणी होत असतंच..याच न्यायाने ‘दलदल’चं ‘दरदर’ व कालांतराने पुढे ‘दादर’ झाला असावं असं मला वाटतं..प्राचीन लोकांची परिसराच्या एखाद्या ठळक लक्षणावरून त्या परिसराला नांव देण्याची लकब लक्षात घेता, दलदल-दरदर-दगर-दादर झालं असावं..
याला आणखी बळकटी देतो तो जुन्या हिन्दीतील ‘दादूर’ वा ‘दादूरा’ हा बेडूक या अर्थाचा शब्द…आता बघा, पाणथळ जमिन, दलदल अशा ठिकाणी ‘दादूरा’ असणं अगदी सहज आहे आणि त्यामुळे बेडकांची जागा या अर्थाने ‘दादूरा’ म्हणजे ‘दादर’ झालं असावं का?
अर्थात हा माझा कल्पनाविलास आहे, यास आधार नाही..पण विचार करायला काय हरकत आहे?
–गणेश साळुंखे
9321811091
नमस्कार.
– र चा ल झाल्याचें हे आणखी एक उदाहरण : संदर्भ इतिहासाचार्य राजवाडे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणें, राजस्थानात असें कांहीं उच्चारबदल होतात, जसें क्ष चा छ होणें. त्याचें उदाहरण म्हणून त्यांनी लिहिलें आहे की, तेथें ‘क्षत्रसार’ या शब्दापासून ‘छत्रसाल’ असें रूप झालें.
– आपल्या विषयाच्या अनुषंगानें, आपल्याला हें दिसतें की, येथें अंतिम ‘र’ चा ‘ल’ झालेला आहे.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक
नमस्कार.
गुजरातमध्ये वापीजवळ ‘दादरा-नगर हवेली’हा भाग आहे. दादरा चेंद दादर शी साम्य पहावे. गुजरातीौमध्ते दादर / दादरा याचा अर्थ पहून कांहीं नवीन बोध होतो कां, तें बघावे लागेल. कारण, तिथें जिना हा अर्थ असणें संभवत नाहीं. तें पाहून मी, कांहीं असलें तर, मांडीनच.
२. र चा ल, आणि ल चा र : आपला लेख वाचल्यापासून मी याची उदाहरणें शोधत होतो. ती अशी :
र चा ल : संस्कृत ‘चर’ म्हणजें फिरणें ( जसें चराचर, निशाचर, विरचण) . या र चें ल होऊन हिंदीत झालेला आहे चल ( चलना , चालचलन) आणि मराठीत चाल ( चालणें, वाटचाल ) . [ अर्थातच, मध्ये एक प्राकृतची stage असणार, पण तूर्तास आपण मांडलेला मुद्दा स्पष्ट आहे. ] .
ल चा र : वैदिक संस्कृतमध्ये नांगराला म्हणतात ‘लांगल’ , लांगल पासून नांगर झाला; म्हणजेच इथें अंतिम ल चा र झालेला आहे.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक
‘दादर’ या शब्दाच्या उगमाबद्दल मी ( बहुधा लोकसत्तामध्ये ) असं वाचलेलं आठवतं की, परळ वगैरे भाग व समुद्राच्या दिशेला ज्या नारळांच्या वाड्या होत्या, त्याच्या लेव्हलमध्ये फरक होता; वाड्या आधिक उंच होत्या. त्यांच्याकडे व समुद्रकिनार्याकडे परळभागातून जाणासाठी जिना बाधलेला होता. अर्थातच, जिन्याला ‘दादर’ म्हणतात. त्यामुळे या भागाला दादर हे नाव पडलें.
ही वरील माहिती कितपत बरोबर आहे, मला माहीत नाहीं.
सुभाष स. नाईक
साइताक्रुझ (प.), मुंबई