MENU
नवीन लेखन...

नेताजी फाईल्स

The Netaji Files

नुकत्याच नेताजींच्या ज्या फाईल्स उघड करण्यात आल्या, त्यात एक फाईल आहे. फाईल क्र. ८७०/११/p/१६/९२/Pol. काय आहे ह्या फाईलमध्ये? ह्या फाईलमध्ये आहे एक पत्र. मोहनदास गांधींचे सचिव खुर्शीद नवरोजी यांनी २२ जुलै १९४६ यादिवशी व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटनला लिहिलेले पत्र!

गांधींतर्फे पाठवलेल्या ह्या पत्रात ते लिहितात, “सैन्याच्या मनात आझाद हिंद फौजेसाठी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या जर का रशियाच्या मदतीने सुभाषचंद्र बोस भारतावर चालून आले, तर ना गांधी ना नेहरु ना काँग्रेस, कुणीही देशाला चुचकारु वा समजावू शकणार नाही”! काय अर्थ निघतो ह्या ओळींचा?

क्रमांक १, सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ नंतरही जिवंत होते. हे तर उघडच आहे. पण यातून निघणारा दुसरा अर्थ जास्त घातक आहे मित्रांनो. नेताजी जर उद्या भारतावर चालून आले तर सैन्य त्यांना मदत करेल व त्यावेळी देशाला गांधी, नेहरु व काँग्रेस यांच्यापैकी कुणीच समजावू शकणार नाही. काय समजवायचं होतं त्यांना? आणि कुणाच्या बाजूने?

इंग्रजांच्या व्हाईसरॉयला पत्र पाठवलंय, याचा अर्थ इंग्रजांना समजवायचं तर नव्हतंच. तसं पत्रात स्पष्ट लिहिलंय “देशाला समजावू शकणार नाही”. यातून ध्वनित होणारा अर्थ उघड आहे की, “मायबाप इंग्रज सरकार काहीतरी करा. आम्ही तुमच्याच बाजूचे आहोत. पण उद्या जर का सुभाषबाबू चालून आले, तर मात्र आम्हीसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही”. आम्ही म्हणजे कोण? तर गांधी, नेहरु व सर्व काँग्रेस! तशी स्पष्ट नावं घेतली आहेत पत्रात. आणि काय समजावणार, तर नेताजी चूक आहेत व इंग्रज सरकारच बरोबर आहे. ते इतके दिवस हेच सांगत आलेले असले पाहिजेत, म्हणूनच तर “नेताजी चालून आल्यावर” समजावून सांगू शकत नाही म्हणताहेत ना!

किती हा नीचपणा! सरळसरळ देशद्रोह आहे हा. आणि ही मंडळी आजवर आमच्या देशाचे नेते म्हणून मिरवत आली. जिथंतिथं विराजमान होत आली. आम्हीच काय तो स्वातंत्र्यलढा लढल्याची फेकाफेक करत आली. प्रत्यक्षात ह्या फाईलवरुन दिसतंय की, ही सगळीच मंडळी इंग्रजांची एजंट होती! एजंट!! ब्रिटीशांना माहिती पुरवणारे आणि योग्य वेळी ब्रिटीश सरकारचं रक्षण करणारे एजंट!!

काँग्रेसला हल्ली ट्विट करताना जो शब्द आवडतो ना, तो होती ही मंडळी – ट्रेटर!! आणि केवळ एवढं एकच पत्र नाहीये बरं का. याच फाईलमध्ये नेताजींनी नभोवाणीवरुन केलेली भाषणेसुद्धा उघड झाली आहेत.

१ जानेवारी १९४६ यादिवशी केलेल्या ह्या भाषणात ते गांधींना टोमणा मारतात, “अहिंसेने कधीच स्वातंत्र्य मिळत नसते”!

२६ डिसेंबर १९४५ यादिवशी नेताजी म्हणतात, “मी परत आलो की, माझ्या लोकांवर खटले भरणाऱ्या सगळ्यांचाच निवाडा करेन”. नेताजींचे हे वाक्य उपरोक्त पत्रासंदर्भात वाचले की आपोआप कळते, नेताजींना अज्ञातवासात राहायला इंग्रजांनी भाग नाही पाडलं, तर त्यांच्या जीवावर उठणारे तथाकथित ‘आपले’च लोक होते!!

— विक्रम एडके 

© Vikram Edke

1 Comment on नेताजी फाईल्स

  1. नमस्कार.
    तुमचा लेख वाचला. भावला. त्यातील तळमळ मनाला भिडली. अहिसेनें स्वातंत्र्य मिळत नसतें , व मिळाले नाहीं, हें अगदी खरें आहे. अहिंसक सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य मिळाले, हा अपप्रचार आहे. १९४२ ची ‘चले जाव’ ही Do or Die चळवळ सुरू करण्यापूर्वी विनोबांनी गांधीजींना विचारले होतें, ‘आम्ही मरायला तयार आहोत, पण तुम्ही ही चळवळ मागे घेणार नाहीं ना ?’ . ‘स्वातंत्र्य मिळेपर्यंत अजिृबात नाहीं’ असें गांधीजींनी assure केले होतें. पण १९४५ मध्ये हा लढा बिनशर्त मागे घेण्यात आला. दुसर्‍या महायुद्धात सुरुवातीला इंग्लंडची पीछेहाट होत होती. तेव्हां आपण लढा सुरूं करून इंग्लंडवर दडपण आणू व मदतीची किंमत म्हणून स्वातंत्र्य प्राप्त करून घेऊ, असा कदाचित गांधीजींचा plan असावा. पण गाठ होती खमक्या चर्चिलशी ! तो मुळीच बधला नाहीं. पुढे, अमेरिका युद्धात उतरल्यावर पालडें पलटलें आणि जर्मनीची पीछेहाट सुरू झाली, दोस्त राष्ट्रे जिंकणार हें स्पष्ट दिसू लागले. त्यामुळे, आपल्या लढ्याचा कांही उपयोग नाहीं, हे जाणून गाधीजींनी तो मागे घेतला, हें स्पष्ट आहे. म्हणजे, विनोबांना दिलेला assurance , आणि देशातील अनेकांनी झेललेले कष्ट व्यर्थच होते , असेच म्हणायला हवे . सावरकर, हिंदुमहासभा, RSS यांनी ( व कम्मुनिस्टांनीही ) १९४२ च्या लढ्यात भाग घेतला नाहीं याबद्दल त्यांच्यावर टीका होते, ती किती फोल आहे, हें सांगायला नकोच. याउलट, जनरल चौधरी यांनी स्पष्ट लिहिले आहे की, सावरकरांच्या आवाहनामुळेच आपण सैन्यात गेलो. अशा व्यक्तींच्या सैन्यातील अनुभवाचा पुढे देशाला किती उपयोग झाला , हें सर्वांना माहीत आहेच. गांधी-नेहरूंना traitors म्हणायचें कां, प्रश्नच आहे . मला तसें वाटत नाहीं. पण, गांधीजींनी ( व पर्यायानें, नेहरूंनी) स्वीकारलेल्या मार्गाची योग्यायोग्यता मात्र इतक्या काळानंतर तरी objectively तपासून पहायला हवी. त्यांना deify करून नुसतें उच्चासनावर बसवून ठेवणें योग्य नव्हे. वेगळी वाट चोखाळण्याचें धैर्य दाखवणार्‍या सुभाषबाबूंना सलाम ! , मग त्याचे pros & cons काहीही असोत. नेताजी १९४५ नंतर नुसते जिवंतच नव्हते, तर नंतरच्या काळात ते UP मध्ये येऊन त्यांच्या मृत्यूपर्यंत ‘गुमनामी बाबा’ म्हणुन राहिले होते, हें आतां स्पष्ट झालेले आहे. त्यांना तसें गुमनाम रहावे लागले, हें देशाचें दुर्भाग्य ! But it speaks hell of lot about the state of our democracy ! बोस-पेपर्स उघड न करणें ही तत्कालीन भारत सरकारची अक्षम्य चूक होती. सध्याच्या सरकारनें ती सुधारली, हें छान झाले. देर आये दुरुस्त आये !
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..