मुंबईत खाबुगिरीसाठी जागांची कमतरता नाही. वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या चवींच्या अक्षरश: सगळ्या खाद्यपदार्थांची उपलब्धता मला वाटते मुंबईशिवाय भारतातल्या कोणत्याही शहरात नसेल.
मुंबईचे एक खास वैशिष्ट्य आहे. इथे तुमच्या खिशात किती पैसे खुळखुळतायत त्यावर वेगवेगळे पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. अगदी गाडीवरच्या वडा-पाव पासून पंचतारांकित हॉटेलमधल्या मल्टी-कोर्स जेवणापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असतात. आतातर गाडीवर चायनिज आणि कॉन्टिनेन्टल पदार्थही मिळतात. अर्थात त्यातील आरोग्याचा भाग सोडा… पण पर्याय उपलब्ध आहे. उडपी रेस्टॉरंट तर अगदी नाक्यानाक्यावर आहेत.
दिल्लीमध्ये तशी परिस्थिती नाही. एकतर मोठ्या हॉटेलमध्ये खा किंवा सरळ धाबा गाठा. इतरही अनेक शहरांमध्ये अशीच परिस्थिती दिसते.
पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराती, राजस्थानी, गोवन, उत्तर भारतीय, बंगाली अशा विविध प्रांतातील पदार्थ खायला घालणारी अनेक उपहारगृहे मुंबईत आहेत. काही केवळ त्या-त्या प्रांताच्या खाद्यपदार्थांपुरती मर्यादित आहेत तर काहीमध्ये सर्व-प्रांत-समभाव हे सूत्र बाळगून सगळ्या प्रांतांचे पदार्थ उपलब्ध आहेत.
याशिवाय चायनिज, कॉन्टिनेंटल, अमेरिकन फास्टफूड, ओरिएंटल, इटालियन, अशा विविध देशांतील खाद्यपदार्थ मिळण्याचीही सोय या मुंबई महानगरीमध्ये आहे.
दाक्षिणात्य पदार्थ मिळणारी उपहारगृहे दक्षिण भारताच्या बाहेर जास्तीत जास्त कुठे असतील तर ती मुंबईतच. मुंबईतल्या माणसाने इडली-मेदुवडा-डोसा हे खायचे नाही असे ठरवले तर त्याला हॉटेलात खायला पदार्थच मिळणार नाहीत की काय असा प्रश्न आज मुंबईत पडतो इतके या दाक्षिणात्य पदार्थांनी आपल्याला घेरले आहे.
अस्सल खवैय्यांना मुंबई आणि परिसरातल्या बर्याच जागा खुणावतात आणि त्यांचा नेहमीच या जागांवर राबता असतो. “जीवाची मुंबई” करण्यासाठी अस्सल खवैय्यांच्या पसंतीची ही काही ठिकाणं आणि नावाजलेले तिथले पदार्थ खाली दिले आहेत.
ही यादी कोणत्याही विशिष्ट क्रमानुसार नाही. गैरसमज करुन घेऊ नये.
१. महेश लंच होम – सेझवान क्रॅब्स.
२. ब्रिटानिया – बेरी पुलाव, कॅरमल कस्टर्ड, पात्रानी मच्छी.
३. कयानी – खीमा पाव.
४. जाफरभाई – मटण दम बिर्याणी.
५. जाफरान – मटण रान मसाला.
६. क्रिम सेंटर – शाही पनीर.
७. किर्ती कॉलेजच्या बाहेरचा वडा पाव.
८. जय जवान, कोळीवाडा – फिश फ्राय, कोळीवाडा प्रॉन्स.
९. प्रितम दा धाबा – दाल मखनी.
१॰. गजाली – बटर पेपर गार्लिक प्रॉन्स.
११. बडे मियॉ – बैदा रोटी, कबाब रोल्स,
१२. बॉम्बे ब्लु – बिर्याणी.
१३. कॅफे लेओपाल्ड – फिश करी, राईस.
१४. ससानियन बेकरी – बन मस्का.
१५. मेरवान – मावा केक.
१६. मोती महाल – दाल मखनी, बटर चिकन, फिश तवा.
१७. जिप्सी चायनीज – चिली चिकन.
१८. मारुश – शेवरामा रोल्स,
१९. नुरानी – चिकन क्लब सॅंडविच.
२०. श्री दत्त, पुणे हायवे – मिसळ पाव,
२१. जिप्सी स्नॅक्स – भरलेली वांगी,
२२. भोजपुरी मन्ना – जॅगरी आईस्क्रीम.
२३. गोविंदा – वेज थाळी.
२४. प्रकाश, दादर – फराळी मिसळ, पियूष
२५. प्रताप दा धाबा – वोडका पाणी पुरी.
२६. बॅचलर्स – चिली आईस्क्रीम,
२७. मामलेदार कचेरी, ठाणे – मिसळ पाव, ताक.
२८. मद्रास कॅफे, माटुंगा – तुप्पा डोसा, कापी.
२९. ईडली हाऊस, माटुंगा – ईडली.
३०. गीता भवन, ग्रॅंट रोड – देसी घी दाल फ्राय,
३१. भगत ताराचंद – गाठीया सब्जी, मसाला छास, दाल फुलका.
३२. खिचडी सम्राट, गिरगाव – काठीयावाडी खिचडी, खीचा पापड, दाल ढोकली,
३३. सरदार, ताडदेव – पावभाजी.
३४. पंचम पुरीवाला – पुरी भाजी.
३५. रुस्तमजी, चर्चगेट – आईस्क्रीम सॅंडविच.
३६. सदीच्छा – तिसऱ्या सुक्के.
३७. हायवे गोमांतक – प्रॉन फ्राय, बांगडा उडीद मेथी,
३८. ओवन फ्रेश, शिवाजी पार्क – बेक्ड डिशेस.
३९. एल्को मार्केट, बांद्रा हिल रोड – पाणी पुरी, छोले पुरी.
४०. गोवा पोर्तुगिजा – स्टफ्ड क्रॅब्ज.
४१. श्रीकृष्ण, दादर – बटाटावडा,
४२. नॅचरल्स – टेंडर कोकोनट आईस्क्रीम, सिताफळ आईस्क्रीम.
४३. आशा लंच होम – भेजा मसाला.
४४ .दाराज धाबा, दहीसर – बटर चिकन.
४५. सी व्हु, जुहु _ पोर्क चिली फ्राय.
४६. किनारा, वसई फोर्ट – बोंबील ठेचा.
४७. जामा, – गुलाबजाम, सेव बर्फी,
४८. लांबा – फिश फ्राय, तदुरी चिकन.
४९. सरोज डेअरी फार्म – सामोसे, स्पे. सोहन पापडी.
५०. श्रीकृष्ण स्विट्स – मेसुरपाक.
यातील प्रत्येक ठिकानावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. लिहिणार आहता?
या यादीत आणखीही बर्याच ठिकाणांचा समावेश होऊ शकतो. आपल्यालाही काही ठिकाणं माहित असतील तर जरुर शेअर करा.
— पूजा प्रधान
Leave a Reply