मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,
कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?
कोडे हे उकलून घ्यावे……।। धृ ।।
श्वास चालतो रात्रदिनीं,
लक्ष्य न घेई खेचूनी,
ऊर्जा मिळते देहातूनी,
परि मनास बंधन नसावे….१,
कोडे हे उकलून घ्यावे
एकचि कार्य एके क्षणी,
एकाग्रता येई दिसूनी,
अवसर मिळे मग कोठूनी,
त्याच घडीला कसे नाम घ्यावे……२,
कोडे हे उकलून घ्यावे,
संसाराचे ‘जू’ मानेवर,
ओढण्यासांगे ईश्वर,
मार्ग सारे असता खडतर,
कसे त्यास वळवावे पाहावे……३,
कोडे हे उकलून घ्यावे.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply