सध्या पाऊस जोरदार पडत आहे. दररोज वेगवेगळी धरणे भरल्याच्या आणि वाहून जात असल्याच्या बातम्याही येत आहेत. या बातम्यात अनेकदा काही वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले दिसतात. ते असतात पाण्याच्या साठ्याच्या मोजमापाचे….
याबद्दलची थोडी माहिती घेउ या ?
1) TMC म्हणजे काय ?
2) Cusec म्हणजे काय ?
3) Cumec म्हणजे काय ?
इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. याचा नेमका अर्थ काय?
आपणास फक्त “लिटर” संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.
१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres
२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.
३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.
उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ५ धरणे
१) उजनी ११७.२७ tmc
२) कोयना १०५.२७ tmc
३) जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४) पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५) पूर्णा येलदरी २८.५६ tmc
Leave a Reply