जीवनात मन:स्वास्थ्य मिळणे फारच आवश्यक आहे. मन:स्वास्थ्य बिघडले तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही.
मन:स्वास्थ्य बिघडले की जीवनात असंख्य समस्या निर्माण होतात. याच्या उलट मन:स्वास्थ्य असेल तर माणसांना समाधानी जीवन प्राप्त होते.
मन:स्वास्थ्य आपोआप निर्माण होत नाही किंवा मिळत नाही. भरपूर पैसा मिळविला किंवा मिळाला म्हणजे मन:स्वास्थ्य मिळेल असा बहूसंख्य लोकांचा भ्रम असतो.
उलट पैसा अधिक मिळू लागला म्हणजे मन:स्वास्थ्य अधिक बिघडत जाते असा बहुसंख्य लोकांचा अनुभव असतो.
विशिष्ट प्रक्रियेने मनाला स्थिर करता आले तरच मन:स्वास्थ्य मिळू शकते.
मनासारखे करीत न रहाता मनाला ‘ सारखे ‘ केल्याने माणसाला मन:स्वास्थ्य प्राप्त होते.
— सदगुरु श्री वामनराव पै
Leave a Reply