नाग हा
जमिनीखाली रहातो.
गुप्त खजिन्यावर पहारा देतो.
कुणी पुढे ठाकलं, तर
फत्कारतो;
कधी चावतोही.
लोक त्याला भितात,
त्याची पूजा करतात
नागपंचमीला.
हा नाग
जमिनीवर रहातो.
गुप्त खजिन्यावर पहारा देतो.
कुणी पुढे ठाकलं, तर
फूत्कारतो;
कधी चावतोही.
लोक त्याला भितात.
त्याची पूजा करतात
काल-आज-उद्या,
कायमच.
किमानपक्षीं,
निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी.
— सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply