पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारित खालील उतारा ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केला होता. तो आपल्यासाठी पुन्हा एकदा.
महाराष्ट्र दिनाच्या सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशेषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती..
‘..मुघल काय किंवा इंग्रज काय, कुणाही परकीयांच्या हातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी जे जे प्रयत्न झाले त्यांत ‘मराठी रक्त’ जितके सांडले तितके अन्य प्रांतातील रक्त सांडले नाही, याची साक्ष देत इतिहास उभा आहे.!
परकीय आक्रमकांवर मराठी माणसाची जबरदस्त दहशत होती आणि आहे. ‘मरा पर हटा नही’ हे ‘मरहट्टा’ माणसाबद्दल मुघल म्हणायचे ते काही उगाचं नव्हे!
आमच्या मराठी स्त्रियाही या बाबतीत मागे हटणार्या नाहीत. ज्या वेळेस इतर प्रांतातील स्त्रिया परक्यांच्या आक्रमणाच्या वेळेस अब्रूरक्षणार्थ ‘जोहार’ करत होत्या त्यावेळेस मराठी रणरागिणी मुलं पाठुंगळी बांधून रणांगणात शत्रुशी त्वेषाने लढत होत्या. सैन्याचं नेतृत्व करत होत्या.
आजही ‘दिल्ली दरबार’ मराठी माणसाला १०० पावले दूरच ठेवतो आणि ही मराठ्यांच्या दहशतीची परंपरा औरंगजेबापासून सुरू आहे.
छत्रपतींच्या वारशाचा मराठी माणसाला जाज्वल्य अभिमान आहे. ‘महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले’ , मराठ्याविन राष्ट्रगाडा न चाले’ ही भावना मनात कायम जपणारा मराठी माणूस आजही भारताच्या एकसंघत्वास जिथे धोका आढळेल तिथे, देशरक्षण हे फक्त ‘आपले कर्तव्य’ आहे, अशा हिरिरीने तीथे मारायला अथवा मरायला सर्वात प्रथम जाईल..!! मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बुडाशी हीच भावना होती..’
पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारीत वरील उतारा, ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्याला पेश केला आहे..!!
जय महाराष्ट्र..!!
– गणेश साळुंखे
Leave a Reply