नवीन लेखन...

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना,

कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना ।।१।।

 

खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा,

निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा ।।२।।

 

उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी,

सांज समयी बंद झापडे,  ठेवी त्यांना एकटी ।।३।।

 

नित्य दिनी प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी,

चिमण्या बांधीत घरटे पूनरपी,  दिवसभरीचे कष्ट करूनी ।।४।।

 

किती काळ हे असे चालले,  गेल्या थकूनी चिमण्या दोघी,

परि विचार सूचला नाही त्यांना,  प्रयत्न करावा इतर जागी ।।५।।

 

मार्गदर्शक कुणीही नव्हता, जेंव्हां बांधीत होते घरटी,

अविचाराने देह झिजवला, राहूनी गेल्या सदैव कष्टी ।।६।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..