माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार,
अर्पित जातो ते, प्रभू चरणांवर….१,
राम नाम जपत, कुणी एक येतात
घटकाभरासाठी, विश्रांती ते घेतात….२,
रोज देती मजला, ओंजळभर फूले
कोणत्या बागेतली, कधी न सांगीतले….३,
त्यांच्याच सांगण्याने, हार मी गुंफीतो
बघतात कौतुकें कसा मी अर्पितो….४,
फूलांची ओंजळ ती, नव्हे तो तर शब्दांचा ठेवा,
कवितेच्या रचनी, उपयोगी पडावा….५,
शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो
विषय मिळूनी, काव्य मी रचीतो….६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
लेखकाचे नाव :
डॉ. भगवान नागापूरकर 9004079850
लेखकाचा ई-मेल :
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply