मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो.
देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” अग्रस्थानी आहे.
९० वर्षांपूर्वी, १९२६ मध्ये स्वर्गिय महादेव यशवंत कुलकर्णी यांनी या उद्योगाची सुरुवात केली. खरंतर त्यापूर्वीपासूनच त्यांनी कोकणातून पंचे वगैरे वस्तू आणून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरु केला होताच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे सुरुवातील गिरगावात आणि नंतर एका वर्षात, १९२७ मध्ये दादर येथे त्यांनी दुकान थाटले.
त्यानंतर त्यांचे चिरंजीव अरविंद महादेव कुलकर्णी यांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष होते. सध्या श्री रमाकांत अरविंद कुलकर्णी हे या दुकानाची धुरा सांभाळत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना यांची साथ आहे.
आता कुलकर्णी कुटुंबाच्या सदिच्छा व स्वराज या चौथ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या या पिढीने आता या उद्योगाला ऑनलाईन जगात आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. लवकरंच “गिरगाव पंचे डेपो”मधील विविध वस्तू ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून घरबसल्या मागवण्याची सोय सुरु होणार आहे.
“देवीच्या साड्यां”नी कुलकर्णींच्या व्यवसायाला भरभराट आणली. त्यामुळे ऑनलाईन व्यवसायाची सुरुवात देवीच्याच साड्या नवरात्रीनिमित्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून करण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्यच आहे.
मराठी ग्राहकाने ज्याप्रमाणे कुलकर्णींच्या तीन पिढ्यांवर प्रेम केले आणि त्यांना साथ दिली तशीच साथ या नव्या पिढीलाही मिळेल याबद्दल रमाकांत आणि अर्चना कुलकर्णींच्या मनात अजिबात संदेह नाही.
पत्ता – ३५४, एन सी केळकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८
फोन – 9869007736
इ-मेल – ramakantarchana@gmail.com
Leave a Reply