ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते.हे २-३ फुट लांब असते हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात.त्यातील पांढरी पुनर्नवा हि प्रामुख्याने भाजी करीता वापरतात.हि भाजी पथ्यकर असली तरी देखील ब-याच प्रमाणात उपेक्षित आहे.म्हणुनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे.
हि भाजी पावसाळयात भरपूर वाढते.अाणी हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत.पांढरी वसुची भाजी अथवा घेटुळी हि चवीला तिखट,कडू,तुरट,व गोड असते.हि उष्ण गुणाची असते व शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष कमी करते.
हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)व्रणातील स्त्राव कमी करायला वसुच्या पानांचा रस काढुन तिचा लेप लावावा.
२)सुज आली असल्यास पुनर्नवा+देवदारू+सुंठ+वाळा ह्याचा काढा गोमूत्र घालून घ्यावा.
३)कफयुक्त दम्याचा त्रास होत असल्यास पुनर्नवाचा काढा वेखंड घालून घ्यावा.
४)पचन नीट न होत असल्यास पाल्याची भाजी, सुप किंवा त्याच्या पाल्याचा रस नियमीत काही दिवस घ्यावा.
५)कावीळीमध्ये पुनर्नवा रस १-११/२ महीना घ्यावा व यकृताचा अशक्तपणा कमी होतो.
६)घाम मुळीच येत नसेल तर त्वचा कोरडी होते व फुटू लागते व त्वचेवरील लव देखील गळू लागते त्यावेळी पुनर्नवेच्या पानांचा रस अंगास चोळावा व त्याची भाजी खावी.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिप्रमाणात संडास व लघ्वी होऊ शकते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply