नवीन लेखन...

डोक्याला ताप देणार्‍या उवा

उवा या कीटकवर्गात मोडतात. डोक्याचे केस, जांघेतले केस व कधीकधी पापण्यांचे केस यांच्या मुळाशी उवा अंडी घालतात. त्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात. उवा त्वचेच्या वरच्या भागात घरे करतात. त्यामुळे खूप खाज सुटते. डोक्यात एखादीही ऊ असली तरी खूप खाज सुटते. उवांची अंडी केसांच्या मुळांना चिकटून राहतात. उवा अस्वच्छतेमुळे व निकृष्ट राहणीमानामुळे एकमेकांत पसरतात. एकमेकांचे कपडे, पांघरूण, इत्यादी वस्तूंमार्फत, तसेच प्रवासात – शाळेत जवळ बसल्याने उवा एकमेकांमध्ये पसरतात.

उपचार

(अ) रॉकेल व खोबरेल तेल निम्मे मिसळून रात्री डोक्यास किंवा खाज असलेल्या भागात चोळून लावावे. किंवा याऐवजी बी.एच.सी. चे (गॅमा) पातळ औषध डोक्याच्या केसांना चोळून चोळून लावावे. दुकानात उवांसाठी बाटल्याही मिळतात.

(ब) औषध लावल्यानंतर सकाळी बारीक दातांच्या फणीने मेलेल्या उवा, लिखा काढून टाकाव्यात. यानंतर डोके साबण आणि पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.

(क) आठवडयाभरात परत औषध लावावे लागते. कारण चुकून राहून गेलेल्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात, त्या माराव्या लागतात.

(ड) कपडयांवरच्या उवा मारण्यासाठी कपडे उन्हात ठेवावे. बी.एच.सी. पावडर कपडयांना लावली तरी उवा मरतात.

घरगुती उपाय

(अ) उवांवर सीताफळाच्या पानांचा किंवा बियांचा रस लावणे हा एक उपाय आहे. यासाठी सीताफळाची कोवळी पाने काढून कुटून त्यांचा रस डोक्यास केसांमध्ये चोळून लावावा.

(ब) याऐवजी आणखी एक उपाय म्हणजे खोबरेल तेलात कापूर मिसळून ते तेल डोक्याला, केसांना चोळून लावणे.

— आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन साभार 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..