संतश्रेष्ठ गजानन महाराज जेवले ती गोस्ट सांगणार आहे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना पुरावा देऊ शकेल, साल २०००-२००१ नाशिक येथील भिसे पती (Retd.मॅनेजर बँक ऑफ बडोदा)पत्नी (Advocate) गजानन महाराज यांचे भक्त.नाशिक येथील कॉलेज रोड चा फ्लॅट सोडून मुंबई नाका येथे नवा फ्लॅट घेतला उद्देश हाच कि इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर जवळ पडेल..झाले नव्या फ्लॅट ची वास्तूशांत ठरली..पत्रिका तयार झाल्या पहिली पत्रिका श्री गजानन महाराज यांना द्यावी म्हणून दोघेही इंदिरानगर येथील मंदिरात गेले महाराजांना विनंती केली आज पत्रिका घेवून आलो आहे पहिला मान तुमचा तुम्ही आवर्जून यावे तुमच्या अशीर्वादा शिवाय कार्य पूर्ण होणार नाही,मनोभावे नमस्कार केला आर्जव केले आणि इतरांना पत्रिका वाटायला निघाले त्यानंतर वास्तू शांतीसाठी अनेक लोक आले प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जेवणे झाली आणि लोक निघून गेली त्या नंतर केटरर्स ने त्याचे ताट,वाटी,पेले नेले..स्वयंपाक घरात स्टुलावर एक ताट राहिले होते जे (जेवल्या नंतर जसे असते तसे) भिसे साहेबांना त्यांच्या सौ.नी (Advocate) ताट आणून दाखवले स्वच्छ केल्यावर त्यांना वाटले कि हे ताट केटरर्स चे राहिले असेल त्यानुसार त्याला फोन केला तो म्हणाला चेक करतो त्या नंतर त्याचा फोन आला कि त्याचे सगळे ताट ज्यांना नं असतो ते व्यवस्थीत पूर्ण आहेत तुम्ही चेक करा कोणा नातेवाईक यांचे असेल …भिसे दाम्पत्यांनी थोडी माहिती घेतली पण असे कसे नातेवाइकांना विचारणार..?आडून पाडून माहिती घेतली पण काहीच पत्ता लागेना एव्हाना सौ.भिसे यांनी ताट बघितले आणि श्री.भिसे यांना दिले आणि सांगितले कि ताटामागे कोणाचे नाव टाकले आहे काय..? श्री.भिसे यांनी पहिले तर त्यावर सं.ग.सं. शेगाव ताट क्र.३०१ असे होते (पूर्वी पासून भांड्यांवर जसे नाव टाकतात तसे..) त्यांनी सौ.भिसे यांना बोलावले आणि सांगितले कि प्रत्यक्ष श्री.गजानन महाराज आपल्याकडे जेवावयास आले होते आणि तुम्हा वकील मंडळींना पुरावा लागतो म्हणून हे ताट स्वतः महाराज येथे सोडून गेले आहेत..
आजही ते ताट त्यांच्या घरी आहे..
खरी गम्मत पुढे आहे…
कर्णोपकर्णी हि वार्ता मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या गृहस्थांना कळली त्या मुळे ते थेट भिसे यांच्या घरी गेले त्या ताटा ची पूर्ण माहिती घेतली त्याचा आकार इ. आणि थेट शेगाव गाठले ..
तेथे श्री.शंकर पाटलांना त्या प्रकारच्या ताटा संबंधी माहिती विचारली तेव्हा श्री.शंकर पाटील यांनी त्यांच्या सहाय्यकास तशी किती ताटे आहेत हि माहिती विचारली ?
साहाय्यक म्हणाला अगदी त्याच धाटणीची १५०० ताटे आहेत.
श्री.भिसे यांच्या ओळखीच्या गृहस्थांनी सहाय्यकास श्री.शंकर पाटील यांच्या मार्फत परत पाठवले आणि ताट क्र.३०१ आणावयास सांगितले..
तो साहय्यक परत आला आणि म्हणाला एकूण १४९९ ताटे आहेत पण ताट क्र.३०१ missing आहे.
ओळखीच्या गृहस्थानी सांगितले कि सदर ताट तुम्हाला मिळनार नाही कारण ते नाशिक येथे श्री.भिसे यांच्या कडे आहे.त्यांनी सदर माहिती श्री भिसे यांना कळविली.
शेगाव चे श्री.शंकर पाटील जे शेगाव संस्थानांत मोठे अधिकारी सद्गृहस्थ त्यांना माहित आहेत शेगाविचा राणा भक्त प्रतिपालक भक्तांच्या इच्छा आजही पुरवितो..
हि तो श्रींची इच्छा!!
आजही ते ताट श्री व सौ.भिसे यांच्याकडे आहे
हे लिहिण्याची प्रेरणा श्री.गजानन महाराजांचीच आहे कारण भिसे यांची श्रद्धा आणि त्यांचे निमंत्रण अगदी सहज आणि भक्तीने ओतप्रोत आहे आजही ते इंदिरानगर च्या श्री.गजानन महाराज मंदिराचे खजिनदार आहेत महाराजांची प्रचिती त्यांना मिळाली kvd मध्ये धार्मिक आणि डोळस श्रद्धावान आहेत…!!
|| जय गजानन ||
|| गण गण गणात बोते ||
Leave a Reply