प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे (वय ४४) यांचे आज २२ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावरच आकस्मिक निधन झाले.
एकबोटे यांचा नाट्यत्रिविधा हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी भरत नाट्य मंदिरात सुरू होता. रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाचे शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी एकबोटे रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरूवात केली. त्यांच्या बहरदार नृत्याला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत होती. त्यांनी नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी तोल जाऊन त्या रंगमंचावरच कोसळल्या. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
एकबोटे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून घराघरामध्ये पोहचल्या होत्या.
सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘गणपती बाप्पा माोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिकेत दिसत होत्या. मा.अश्विनी एकबोटे यांनी बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी चित्रपटात देखील काम केले होते.
त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ रोजी झाला. त्यांच्या पश्चात पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर आहे.
अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply