आज केरसी लॉर्ड यांचे निधन झाले.
जन्म:- १४ फेब्रुवारी १९३५
केरसी लॉर्ड यांची माहिती
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा.लॉर्ड कॉवस हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. मा.केरसी लॉर्ड यांचे संपूर्ण कुटुंब संगीत या विषयात होते. १९३१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आलम-आरा’ पासून १९९० सालापर्यंतच्या विविध संगीतकारांकडे लॉर्ड कुटुंबीयांनी वेगवेगळी भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यं वाजविली आहेत. सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक म्हणून मा.केरसी लॉर्ड यांनी काम केले होते. केरसीजींनी कास्टनेट्स, ग्लॉकेनस्पिल, चायनीज टेंपल ब्लॉक्स अशी विदेशी वाद्ये व त्यांचा विविध चित्रपटगीतांमध्ये वापर केलेला होता. संगीत क्षेत्रात डीडी म्हणून संगीतरसिकांना माहीत असलेले डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे , हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. केरसी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला होता. त्याची गोष्ट सांगताना मा केरसी लॉर्ड दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते. त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल , याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली. डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला. ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ‘ पंचमदां ‘ कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला. डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर त्यांनी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीर्चा सिंथेसायझर आजही केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी आहे. आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. ते पिंपळपान केरसी लॉर्ड आजही जीवापाड जपून आहेत. डावजेकरांनी तयार केलेला हा अस्सल भारतीय सिंथेसायझर मा.केरसी लॉर्ड यांनी मोठ्या प्रेमाने जतन केला आहे. आर.डी बर्मन हे वेस्टर्न संगीताकडे आकर्षित केले हे खरे असले तरी वेस्टर्न संगीताशी आर.डी ची खरी ओळख करून दिली ती केरसी लॉर्ड यांनी. सुट्यात पंचम केरसी लॉर्डकडे जॅझ्झ, लॅटिन अमेरिकन, युरोपिअन आणि मिडल इस्टच्या रेकॉर्ड्स ऐकत असत. केरसी लॉर्ड व त्यांचे बंधू बुर्जोर लॉर्ड यांना ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ मिळाला होता. मा. केरसी लॉर्ड यांनी लता मंगेशकर यांचा एक किस्सा सांगितला होता. लता मंगेशकर यांनी हौसेने सेंकड हँड गाडी घेतली होती. त्या गाडीच्या दोन चाकांवर व्हिलकॅप नव्हती. त्यांचा ड्रायव्हर जयसिंग त्या विकत घेण्यासाठी सकाळीच चोर बाजारात गेला. तेथील माणसाने गाडीचा मेक व इतर माहिती घेतल्यावर, ‘आप यही रूको, अभी मैं व्हिलकॅप लेके आता हूँ ’ असे म्हणत पाच मिनिटांत दोन नव्या व्हिलकॅप आणल्या. जयसिंग त्या पॅक करून पैसे देऊन घरी आला. दुपारी तो त्या कॅप चाकांना बसवायला गेला, पाहतो तर काय, पहिल्या दोन्ही चाकांच्या व्हिलकॅप गायब! चोरबाजारातील त्या अनोळखी माणसाने गाडीच्या (लतादीदींच्या) दोन व्हिलकॅप्स काढून त्या जयसिंगलाच विकल्या होत्या!
मा.केरसी लॉर्ड यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply