नवीन लेखन...

टिप्पणी – इच्छामरण

बातमी  :  डच गव्हर्नमेंट पासेस् अ लॉ फॉर असिस्टेड डेथ् फॉर दि हेल्दी

संदर्भ  –  हल्लीहल्लीची, पाश्चिमात्य देशातील एका टी.व्ही. चॅनलवरील बातमी.

 

  • आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतात आत्महत्या हा एक गुन्हा मानला जातो. कांहीं काळापूर्वी सरकारनें Euthanasia म्हणजेच दयामरण या विषयावर मतें मागवली होती. ( याविषयी मी सरकारला पाठवलेला माझा, ‘Dayamaran and Ichchhamaran’ हा इंग्रजी लेख, जिज्ञासूंनी माझी वेबसाईट  www.subhashsnaik.com  येथें वाचावा ).
  • थोडक्यात मुद्दा असा आहे की, दयामरण हे त्या पेशंट्स् साठी असतें जे  terminal disease ने पीडित असतात, व / किंवा brain-dead असतात. पण मुख्य गोष्ट अशी की, माणूस हा एक thinking animal आहे, आणि म्हणून स्वत:च्या जीवितावर व मरणावर त्याचा अधिकार असायला हवा. म्हणजें, दयामरण तर हवेंच,पण इच्छामरण मान्य असणारा कायदाही अस्तित्वात यायला हवा.
  • जे लोक acutely depressed असतात व आत्महत्येचा प्रयत्न करतात, त्यांची गोष्ट वेगळी ; ती चर्चा इथें अभिप्रेत नाहीं. त्यांना psychiatrist च्या मदतीची आवश्यकता आहे. ( म्हणून, सरकारनें आता पूर्वीचा, आत्महत्या हा गुन्हा असण्याचा , कायदा बदलला, हें स्तुत्यच आहे) .
  • पण आपण मुख्यत्वें बोलत आहोत अशा लोकांबद्दल जे वृद्ध आहेत , आणि ज्यांना dignified death ची इच्छा आहे. असें इच्छामरण त्यांच्या स्वत:च्या हातात असायला हवें. ती आत्महत्या नाहीं, व गुन्हा तर नाहींच नाहीं. कायदा त्याला ‘बेकायदेशीर’ भले ही म्हणो, पण तें कृत्य अनैतिक (immoral) खासच नाहीं.
  • महाभारतातील भीष्मांना इच्छामरणाचा वरच मिळालेला होता. भीष्मांनी, पालनासाठी महाकठीण अशी प्रतिज्ञा केली होती, फार मोठा त्याग केला होता ; म्हणून त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला. यावरून, अगदी पुरातन काळापासून इच्छामरणाला भारतीय संस्कृतीत असलेला उच्चकोटीचा सन्मान व महत्व आपल्या ध्यानात येतें.
  • तसेंच, भारतीय संस्कृतीत इच्छामरणासाठी प्रायोपवेशन, संथारा असे पर्याय गेली अनेक शतकें उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे यांनी प्रायोपवेशन केलें होतें, व त्यांच्या या कृत्याबद्दल अतिशय आदरानें बोललें जातें. कांहीं जैन मुनी संथारा करतात, व तेंही अतिश्रेष्ठ मरण मानलें जातें. हल्लीच एक मुनी असा संथार करत होते. (म्हणूनच, संथारा म्हणजे आत्महत्या नाहीं व त्याला परवानगी दिली जावी, यासाठी कांहीं जैन संघटनांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केलेली आहे).
  • इच्छामरण स्वीकारणार्‍या व्यक्ती थोर होत्या हें खरेंच ; पण माझ्या माहितीत अशीही उदाहरणें आहेत जिथें ‘तथाकथित सामान्य’ व्यक्तींनी प्रायोपवेशन अथवा संथारा केलेला आहे ; किंवा असें कांहींही ‘फॉर्मल’ नांव न देतां अन्न व नंतर पाणीही वर्ज्य करून,  dignified, सन्माननीय, मरण स्वीकारलेलें

आहे ; जसें की, माझ्या घरासमोर रहाणार्‍या जैन गृहस्थाचा काका,  माझ्या एका मित्राचे सासरे, माझ्या

पत्नीचे ज्येष्ठ चुलतभाऊ.

( मी या लोकांना ‘तथाकथित सामान्य’ असें म्हणालो, कारण स्वहस्तें विचारपूर्वक मरण स्वीकारणारी व्यक्ती ‘साधारण’ असूंच शकत नाहीं ). Kudos to them !

  • मला या ठिकाणी, माझी स्वत:ची दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता हिचेंही उदाहरण द्यावेसें वाटतें. २०१४ मध्ये तिला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हां रोगाचें मेटास्टॅसिस झालेलें होतें, व रोग ‘स्टेज ४’ मध्ये गेलेला होता. स्नेहलतानें मानसशास्त्रात पीएच्. डी. केलेलें असल्यामुळे म्हणा, किंवा मन खंबीर असल्यामुळे म्हणा, अथवा दृष्टिकोन अतिशय प्रॅक्टिकल असल्यामुळे म्हणा, किंवा गेली अनेक वर्षें एकूणच तिचें मत इच्छामरणाच्या बाजूनें होतें, म्हणून म्हणा,  पण स्वत:ला हा रोग झाल्याची बातमी आणि रोगाची सीरियस लेव्हल कळल्यापासूनच तिनें आपल्या भावी मृत्यूचा अगदी सहजपणें स्वीकार केला  होता.    Hats off !

त्यामुळे, कांहीं महिन्यांनंतर जेव्हां तिचा रोग अधिक बळावला, शक्ती कमी कमी होऊं लागली, थोडेंफार परावलंबित्व येऊं लागलें , तेव्हां तिनें शांतपणें डॉक्टरांकडे पृच्छा केली की, सहजपणें क्षणार्धात पेशंटला वेदनारहित मरण येईल असा कांहीं उपाय डॉक्टरांकडे असतो कां ? आणि, हें संभाषण तिनें अतिशय संतुलितपणें आणि विचारपूर्वक केलें. तिचा प्रश्न ऐकून डॉक्टर किंकर्तव्यमूढ झाले, काय बोलावें तें क्षणभर त्यांना सुचेना.

मला जरी भावनिक पातळीवर तिच्या प्रश्नानें बेचैन केलें , तरी बौद्धिक पातळीवर मला आश्चर्य वाटलें नाहीं, कारण तिचें गेल्या अनेक वर्षांपासूनचें याबद्दलचें मत मला माहीत होतें. ( आणि, इच्छामरणाच्या बाबतीत माझेंही मत स्नेहलतासारखेंच आहे, त्यामुळे, तिचे विचार मी समजून घेऊं शकलो).

अर्थातच, डॉक्टर या विषयात कांहींही करूं शकत नव्हते, ते केवळ रोग contain करण्याचा (विफल ) प्रयत्न करूं शकत होते, आणि तो प्रयत्न त्यांनी अखेरपर्यंत केलाही.

स्नेहलताचें भाग्य थोर की तिला खितपत न पडतां,  त्रास न होतां, अल्पावधीत मरण आलें. ती bed-ridden झाली नाहीं, धरून-कां-होईना पण चालूं शकत होती, शेवटपर्यंत बोलत होती, आणि अखेरच्या दिवशीही तिची विनोदबुद्धी शाबूत होती.

स्नेहलताला नैसर्गिकरीत्या ‘इच्छामरण’ प्राप्त झाले कां, मला माहीत नाहीं. पण, ज्या रात्रीं ती गेली, त्या दिवशी सकाळीच तिनें मला, ‘मी चालले आहे’ असें सांगितलें होतें .

( त्या वेळी , तिच्या विधानाची सीरियसनेस मला कळली नाहीं, याबद्दल मला आतां कायमच खंत वाटते ; कारण , नाहीतर मी नक्कीच तिच्या अखेरच्या दिवशी अधिक वेळ तिच्या सोबत घालवला असता !)

मात्र, स्नेहलतामुळे मला वारंवार,  इच्छामरणाच्या विषयाची आठवण येत असते, हें खरें.

 

  • भारतात अजून इच्छामरणाचा कायदा झालेला नाहीं. मात्र, हॉलंडमध्ये तसा कायदा केला गेला ही फार चांगली गोष्ट आहे. ( अर्थात्, त्या सरकारनें त्या कृत्यासाठी कांहीं सेफगार्डस् निर्माण केले असतीलच. तें ठीकच आहे ).

हॉलंडबद्दलची बातमी वाचून मला, या प्रगतीबद्दल आनंद तर वाटलाच ;  पण टर्मिनल-डिझीझ नसतांनाही मरणेच्छा करणार्‍यांना आतां इच्छामरणासाठी नुसती संमतीच नाहीं, तर, मदतही प्राप्त होऊं शकेल, असा कायदा करणार्‍या सरकारबद्दल ( म्हणजेच, जनतेनें निवडून दिलेल्या रिप्रेझेंटेटिव्हज् बद्दल ) मला अतीव आदर वाटतो आहे.  त्या सरकारच्या या कृतीवरून आपल्याला डच जनतेची सांस्कृतिक maturity, विचारांचा पुढारलेपणा आणि बुद्धिवादी वृत्ती दिसून येते.

 

  • अखेरीस असें आहे की, वृद्धत्वामुळे म्हणा, किंवा दुर्धर व्याधीमुळे म्हणा, किंवा कांहीं अन्य कारणामुळें म्हणा, जर एखाद्या व्यक्तीला सन्मानपूर्वक-मरण हवें असेल, तर निश्चितच तो त्या व्यक्तीचा अधिकार आहे , व त्या व्यक्तीला डिग्निफाइड मृत्यू स्वीकारूं देणें यासारखें दुसरें सत्कृत्य नाहीं.

+ + +

— सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph- Res- (022)-26105365. M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com,

www.snehalatanaik.com.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..