नवीन लेखन...

घरी उटणे कसे बनवाल ?

भारतातील प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटण्याचे आयुर्वेदिक महत्वही आहेच. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे.

पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात.

खाली दिलेले सर्व सामान आपणाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळु शकेल. त्यात गुढळ्या असल्यास फोडून घेऊन , चांगले चाळून घ्यावे व हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

साहित्य

मसूर डाळ पीठ 110 ग्राम
आवळकाठी 10 ग्राम
सरीवा 10 ग्राम
वाळा 10 ग्राम
नागर मोथा 10 ग्राम
जेष्टमध 10 ग्राम
सुगंधी कचोरा 10 ग्राम
आंबेहळद 2 ग्राम
तुलसी पावडर 10 ग्राम
मंजीस्ट 10 ग्राम
कापूर 2 ग्राम

हे घरी बनवलेले उटणे आपण सणासुदीला वापरु शकता. उटणे फक्त दिवाळीतच का वापरायचे? घरच्या घरी बनवलेले उटणे केव्हाही वापरता येईल.

1 Comment on घरी उटणे कसे बनवाल ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..