आज ९ नोव्हेंबर.. आज अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेचा वाढदिवस.
सुबोध भावे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाला.
मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता अशी सुबोध भावेची ओळख आहे. मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने सशक्त भूमिका साकारल्या. ‘अवंतिका’,‘वादळवाट’ आणि सध्या सुरू असलेली ‘का रे दुरावा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत्या. लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केलेले आहे.
‘बालगंधर्व’ सिनेमातील सुंदर व अप्रतिम भूमिका साकारून सुबोधने सर्वांची मनं जिंकली तर ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ सिनेमातील त्याने साकारलेल्या लोकमान्यांच्या कणखर भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याने ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलीय. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटांच्या प्रसिद्धीनंतर सुबोध भावे यशाच्या शिखरावर आरुढ झाला आहे. तो आता एक मल्याळम चित्रपट करणार असल्याचे समजते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्या ‘पिन्नेयुम’ या चित्रपटाद्वारे सुबोध मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
Leave a Reply