माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते.
अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी भरभराट केली होती. त्याच्या गुणग्राहकतेची ख्याती सर्वत्र होती. एकदा त्याला कोणीतरी विचारले, की चांगली माणसे तुम्ही शोधता तरी कधी आणि केव्हा? त्यासाठी तुम्ही कोणाकडे प्रशिक्षण घेतले आहे काय?
त्यावर कार्नेगी यांनी त्याला फार समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले, चांगली माणसे शोधणे म्हणजे मातीतून सोने मिळविण्यासारखे आहे.. जर तुम्हाला मातीतून एक किलो सोने मिळवायचे आहे, तर त्यासाठी हजारो टन माती उकरावी लागेल. अर्थात तुम्ही त्या वेळी केवळ माती उकरायला नाही तर त्यातील सोने शोधायला गेला असाल तरच तुम्हाला थोडे फार सोने मिळू शकेल. चांगली मासे याच पद्धतीने शोधायची असतात. कार्नेगी यांचे हे उत्तर ऐकून प्रश्नकर्त्यांचे साहजिकच समाधान झाले.
Leave a Reply