नवीन लेखन...

पन्नाशी

पन्नाशी
आयुष्य पुढे धावत असते,
वय सारखे वाढत असते,
पण……
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते ,,,,,

उच्छृंखल आणि समंजसपणा,
यामधली मर्यादा कळते,
अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,

जगण्याची परिभाषा,
थोडी थोडी बदलू लागते,
काय हवे अन् काय नको,
हे नेमकेपणे कळू लागते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,,

जगणे समजुन घेण्याचे,
हेच खरे वय असते,
याच वयात आपण स्वत:साठी, जगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,

आयुष्याच्या चित्रपटातील,
हेच मध्यंतर असते,
इथूनच पुढे,
शेवटच्या क्लायमेक्स कडे
जायचे असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,

म्हातारे होण्याआधीचे,
हे शेवटचे तरूणपण असते,
ते, आपण मनापासून उपभोगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,,

पन्नाशीनंतरही पावसात
भिजावेसे वाटणे,
हे मन अजुन हिरवे असल्याचे
लक्षण असते,
खरी मजा जगण्याची,
पन्नाशीनंतर सुरू होते,,,,,

पन्नाशीपुढच्या मित्र मैत्रिणींनो, एकदा तरी अवश्य वाचाच….

खरंतर हेच वय आहेन आयुष्याला चॅलेंज करायचे.

त्याने शिकवलेले अनुभव वापरून, इच्छा असल्यास चाकोरी मोडून आपल्याला आनंद मिळेल ते सुरु करण्याचे.

आयुष्याच्या विमानाचा डिसेंड सुरु व्हायला अजुन अवकाश आहे. आत्ता तर कुठे “सिट बेल्ट ऑफ” ची साईन आली आहे.

ही वेळ आणि वय आहे “क्रूझ” करायचं, नवी क्षितिज गाठायचं, नवी आव्हान स्वीकारायचं, आयुष्याकडून शिकायचं, जे शिकलो ते इतरांना द्यायचं..!

कारण पन्नाशी म्हणजे नृसिंह अवस्था.!

ना तरुण ना म्हातारा,
ना नवशिका,
ना पूर्ण अनुभव संपन्न,
ना खूप आसक्ति
ना पूर्ण विरक्ति,
ना पूर्ण सौष्ठव,
ना गलित गात्र,

आयुष्याच्या एका फेज मधून दुसऱ्या फेज मधे जायचा उंबरठा….

जमतील तसे आणि तेथे आपले अनुभव शेयर करा.

आपण आयुष्यात अनुभवलेले खड्डे चुकवायला इतरांना मदत करा,
पोरांचे मित्र व्हा,
त्यांच्या मित्र मैत्रिणींचे Buddy व्हा,
सामाजिक कार्यात सक्रीय भाग घ्या,
सभ्यतेच्या परिघात राहून बिनधास्त गॉसिप करा,
शाळेची गेट टुगेदर आयोजित करा,
ट्रेकला जा,
रिक्षा किंवा टॅक्सीवाल्यावर दादागिरी करून “आवाज कुणाचा” चे ऐन जवानीतले जोशाचे दिवस कधीतरी परत अनुभवा.

औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नाशिबी लागल्या असतील त्यांनी त्या नेमाने घ्या, पण एखाद्या पार्टीत मित्रांबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा.

पावसात भिजा,
जॉगिंग करा,
सूर्यनमस्कार घाला,
लाँग ड्राइव्हला जा,
सिनेमे पहा,
काका / काकू म्हणतील त्यांचे काका / काकू व्हा,
दादा म्हणून जवळ येतील त्यांचे थोरले बंधू व्हा,
अनुभवाचं ओझं इतरांना वाटून थोड हलक करा.

मुख्य म्हणजे हसत रहा.
एकदा मनाशी पक्के बांधले की पन्नाशीचा घाटमाथा म्हणजे, पालिकडल्या उताराची सुरुवात न वाटता अलिकडचा चढ चढून शिखर सर केल्याचा आनंद देऊ शकतो. पन्नाशी टेंशन न रहाता सेलिब्रेशन बनते.

आणि मग पन्नाशी हा फक्त एक आकडा रहातो…
जस्ट अनदर ब्लडी नंबर…

म्हणूनच म्हणतो …..
ENJOY YOUR
पन्नाशी पुढे ….

Avatar
About Guest Author 524 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..