पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना —
भारतात – महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.
नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात
लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो पाळतात.
कंबोडीयात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला आहे. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहीरात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीत जाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात.
कोरीयात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात विशिष्ठ वाणाचा भाताचा पिंड करून वाहातात त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात.
मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात.
विएतनाम मध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात.
चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळात तेथे पाऊस असतो, सुगी असते.
जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरीम्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यात सोडतात, तिसर्या दिवशी तीरो नागाशी – विशेष अन्नपदार्थ करतात.
इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात.
जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो.
रोम मध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे.
मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात.
हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे – जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात
मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात – दिआ द ला मुरतोस – हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.
अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मे मधला शेवटचा सोमवारमनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी.
ऑल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
याशिवायही अनेक देशांमध्ये, लोकसमूहांमध्ये ‘पितरं घालण्याच्या’ पद्धती असू शकतील. बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये पूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत असे दिसते. ते ते स्थानिक लोक त्या त्या कृती त्या त्या दिवसात केल्या नाहीत किंवा त्यांना जमले नाही तर हळहळत असतील, पाप लागले असे म्हणत असतील. जगभर रूढी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या न केल्याबद्दल – पाप – लागायचेच असेल तर सगळ्यांनाच पाप लागणार कारण कोणीच जगातल्या सर्वच्या सर्व रुढी पाळत नाहीत. रुढी कालानुसार बदलतात पण आपल्या जन्माला कारण असणार्यांबद्दल कृतज्ञ राहाण्याची भावना मात्र सर्वांच्यात शाबूत दिसते. –
अधिक माहितीसाठी पहा.
http://epaper.eprabhat.net/337780/Rupgandh/Rupagandh#page/9/1. श्राद्ध वगैरे कल्पना ब्राह्मणांनी समाजाला लुटायला निर्माण केल्या असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांनी वरील माहिती लक्षात घ्यावी.
Leave a Reply