नवीन लेखन...

डोंगर, कागद आणि लेखन

तो निश्‍चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. तो निर्जीव आहे . पण सजीवागत बोलतो. गप्पा करतो गुराख्यांशी. डावात सहभागी होतो. विटी-दांडू, गोट्या, लोकरीचा खेळ, नसता चिर्रऽ घोडी. गुरं रानोमाळ पांगलेली. गच्च फुगलेली. तिथेच आम्ही घेतो कागद आणि कागदावर उतरत जातात कविता. अभिव्यक्त होणं. गाव टप्प्यात असतंय. वस्ती नजरेत भरते. झाडात हरवलेलं.. बारीक सुंदर नक्षी दिसते रानाची. नदीची. बगळे रांगेत बागडतात. साप, सरडे, पाली, उंदीर, घोरपड हे घेतात आनंद. तसे हरण, ससा, साळिंदर, उदमांजर सर्वच बोलतात एकमेकांशी. तो आहे डोंगर. त्याचं नाव डोबीचा डोंगर. कृषकांचा, पशुपक्ष्यांचा आवडता. तसा माझाही आवडता. उन्हाळा, पावसाळा येतो. ऋतू बदलतात. तो अढळ असतो. साहित्य निर्माण झाले तिथे. भरभरून उतरवल्या कथा, कविता कागदावर तशा मनात. तो कलाटणी देऊन गेला. स्थिर उभा राहा माझ्यासारखा, असाच संदेश देत असतो मला. आता फिरकत नाही सहसा तिकडे मिळेल वेळ तसा दूरवरूनच पाहतो त्याला. तो जसा होता तसाच आहे नक्षीदार. आठव असतो सोबतीला त्या दिवसांचा..

— विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
मो.9421442995

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..