सात कोटीची वस्ती असूनी,
सुंदर वसले शहर एक ।
प्रत्येक जण स्वतंत्र असूनी,
कार्ये चालती तेथे अनेक ।।
सुसंगता शिस्तबद्ध
साह्य करिती एकमेकांना ।
शत्रूची चाहूल येतां,
परतूनी लाविती त्या घटना ।।
अप्रतिम शहर असूनी,
नाव तयाचे असे ‘पुरूष’ ।
‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी,
मालक त्याचा आहे ‘ईश ।।
अशीच अगणित शहरे,
या अथांग विश्वाच्या शरीरी ।
विधात्याची वास्तूकला,
अप्रतीम अजोड ठरे खरी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply