ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांचे निधन झाले..
आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला.अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही त्यांनी चौफेर मुशाफिरी केली होती. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. मा. आनंद यादव यांना यादव यांच्या नटरंग कादंबरीवरून चित्रपटनिर्मिती झाली होती. मा.आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.
मा.आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आनंद यादव यांची साहित्यसंपदा : अ९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या, ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव, ग्राम संस्कृती,मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती, मराठी लघुनिबंधाचा इतिहास, कलेचे कातडे, साहित्यिकाचा गाव, आदिताल, सैनिक हो, तुमच्यासाठी, शेवटची लढाई, आत्मचरित्र मीमांसा, झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, भय, माउली, नटरंग, भूमिकन्या, उखडलेली झाडं, झाडवाटा, स्पर्शकमळे, माळावरची मैना, पाणभवरे, डवरणी, खळाळ, मळ्याची माती, मातीखालची माती, माय-लेकरं, एकलकोंडा, घरजावई, उगवती मने, लोकसखा ज्ञानेश्वनर, संतसूर्य तुकाराम.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply