आजकाल लहान वयातच केस पांढरे होणे ही साधारण समस्या बनली आहे. या समस्येचे मुख्य कारण व्यस्त जीवनामध्ये केसांची नीट देखभाल न होणे, प्रदूषण हे आहे. यामध्ये लहान वयाचतच झालेले पांढरे केस लपविण्याकरिता हेअर डाय किंवा हेअर कलर हा एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपाय केले तर पांढ-या केसांना नैसर्गिकरित्या आपण काळे करू शकता.
दोडक्याचे काप खोबरेल तेलात काळे होईपर्यंत उकळा. यांनतर हे तेल गाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. रोज हे तेल केसांना लावल्यास हळूहळू तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील.
तीळाचे तेल ही गुणकारी असते. बरोबरच याच्या सेवनाने बरेचसे फायदे होतात. जर आपण जेवणात तीळाचा समावेश केला तर दीर्घकाळापर्यंत केस काळे व घनदाट होतील.
केस धुताना शिकेकाई पावडर किंवा माईल्ड शॅम्पू वापरावा.
एक कप पाण्यात चहापत्ती उकळून यामध्ये एक चमचे मीठ टाकावे. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी एक तास आधी लावून ठेवल्याने केस काळे होतात.
खोबरले तेलात ताज्या आवळ्यांना काळे होईपर्यंत उकळा. या मिश्रणाला थंड करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. आणि सकाळी केस धुवा.
आले वाटून त्यामध्ये थोडासा मध घालून पेस्ट तयार करावी आणि ती केसांना लावावी. हा उपाय दररोज केल्याने पांढरे केस काळे व्हायला लागतात.
केसांना दररोज मोहरीचे तेल लावल्याने केस नेहमी काळे राहतात.
खोबरेल तेलात कडिपत्त्याची पाने काळी होईपर्यंत उकळा. या तेलाला केसांच्या मुळाशी लावल्याने केस काळे व घनदाट होतात.
रोज उपाशी पोटी आवळ्याचा रस पिल्याने केस दीर्घकाळापर्यंत काळे राहतात.
सुक्या आवळ्यांना पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये निलगीरीचे तेल मिसळा. या तेलाला एक रात्र लोखंडी भांड्यात ठेवा. सकाळी यामध्ये दही, लिंबूचा रस व अंडे घालून केसावर लावा. पंधरा दिवस हा उपाय केल्यावर केंसामध्ये एक चमक येऊन पांढरे केस काळे होऊ लागतात.
आवळ्याचा रस, बादाम तेल व लिंबाचा रस एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी लावल्याने केस पांढरे होणार नाहीत.
कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळायचे थांबतात व पांढरे होत नाहीत.
लहानपणीच केस पांढरे झाल्यास एक ग्रॅम मिरी पावडर दह्यात मिसळून लावल्याने केस काळे होतात.
१ चमचा मेहंदी पावडर, १ चमचा मेथी, ३ चमचे कॉफी, २ चमचे तुळशीची पावडर, ३ चमचे पुदीना पेस्ट एकत्र मिसळून केसांना लावा. ३ तासानंतर केस धुवा. पांढरे केस काळे होऊ लागतील.
मेहंदीला खोबरेल तेलात मिसळून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला केसांना लावल्यानंतर केसांचा रंग डार्क ब्राऊन होऊ लागतो.
केस धुण्यासाठी लिंबू रस मिसळलेल्या पाण्याचा उपयोग करावा. केस नैसर्गिकरित्या ब्राऊन होतात.
लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून नियमितपणे लावल्यास केस काळे होऊ लागतात.
आवळा व आंब्याची कोय ही एकत्र वाटून केसांना लावल्यास केस काळे होतात.
केसांना रोज मेरी तेल लावल्यास केस काळे होतात.
कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाशी हलक्या हाताने लावल्यास केस काळे व घनदाट होऊ लागतील.
आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने किंवा ताज्या आवळ्यांना वाटून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केस काळे व घनदाट होतात.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply