आरोग्यटीप बर्याच जणाकडे फिरते आहे, माझ्या एका **कडे तर सात आठ गटातून येते, तीपण बाकीच्यांना पुढे पाठवते. पण स्वतः न वाचताच !
कृपया असे होऊ नये. पुढे पाठवावीशी वाटली तर स्वतः वाचून नंतरच पुढे पाठवावी.
नाहीतर इकडून तिकडून गेले वारे…
ज्यांच्याकडे पाचसहा जणांकडून दररोज आरोग्यटीप येऊनही वाचली गेली नाही, अश्या महाभागांसाठी, “त्या महत्वाच्या सूत्रातील” सर्व मुद्यांचा एकत्र विचार करून निघालेले सार….
जरा वेगळ्या शब्दात
1.आपण रहातो त्या प्रदेशातील जमिनीमधे उगवणारे अन्न, भाजी, तेल यांचाच वापर न चुकता आपल्या नेहेमीच्या जेवणात करावा.
जिथे जे पिकत नाही, तिथे बाहेरील प्रदेशातून विकत आणून खाण्याची गरज नाही. मग ती भाजी असूदेत, किंवा सफरचंद, द्राक्षे वा सफोला.
2. आपल्या कुटुंबातील आहार परंपराचा शोध घ्यावा. आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे, या जेवणाच्या परंपरा शक्यतो बदलू नयेत.
म्हणजे ज्यांच्या जेवणात जे तेल जास्त वापरले जाते, तिथे तसेच वापरावे, जसे केरळमधे किंवा कोकणात खोबरेल तेल. इथल्या लोकांनी उगाचच जाहीरातीच्या मागे लागून त्या करडई, सफोला, राईसब्रानच्या मागे लागू नये.
पुनः लक्षात घ्या. जिथे बदाम पिकतो, तिथे बदामाचे तेल वापरा. अन्यथा कोणत्या तरी कुकरी शो मधे दाखवले जाते म्हणून, कोणतीतरी शिनेतारीका सांगते म्हणून, शिरा करताना बदाम तेल वापरू नका.
ज्यांनी आपले बालपण, ज्या प्रदेशात काढले असेल, किंवा माहेर कोकणात आणि लग्नानंतर घाटावर एखादी मुलगी गेली असेल, तिला कोकणी आहार सहजपणे पचणारा असतो. पण काही कारणास्तव मूळ प्रदेश सोडून दुसर्या वातावरणात, अन्य (पर)देशी चल जाऊ, असे रहायला जायचे असेल तर, जिथे रहायला जाणार तिथला आहार पचनी पडेपर्यंत, मूळ आहारातील, तेल, मसाले वा अन्य पदार्थ बदलू नयेत. तीनचार महिन्यात नवीन प्रदेशातील, नव्या वातावरणातील आहार सहजपणे पचला जावा, यासाठी काही पदार्थ जुन्या प्रदेशातील, तर काही पदार्थ नवीन प्रदेशातील करून खावेत, म्हणजे आपली त्या पदार्थातील सात्म्यता वाढते. आणि अॅलर्जी कमी होते..
गॅवरी हो या गौरी, शिव की नौरी यदी बनना है और यदी सरसों के तेल की अॅलर्जी है, तो फिर शिव को पाने के लिए, सरसोंके तेल की फोडणी तो देनीही पडेगी ना ! गोडा तेल तो छोडना पडेगा, नही तो अम्मा से, लेने के देने पड जाऐंगे । का कहत है ?
जसा देश, तश्या आहारपरंपरा.
ज्यांचे मुख्य जेवणात मासे आणि भात हा मुख्य पदार्थ असेल, त्यांनी तो लगेचच बदलू नये. तसेच अंडी, मांसाहार बदलवायचा असेल तर, तो सोडण्यासाठी सुद्धा काही काळ (साधारणपणे तीन महिन्यांचा ) जाऊ द्यावा. ( दर तीन महिन्यांनी म्हणे, शरीरातील सर्व पेशी बदलत असतात, असे नवीन विज्ञान सांगते.)
पण ज्यांच्या, या किंवा पहिल्या पिढीत जर मांसाहारी पदार्थ आहारात नसतील, त्यांनी ते पदार्थ सात्म्य करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे नाॅनव्हेज सुरू करण्याची आवश्यकता नाही.
(या टीपेतील कठीण शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी आधीच्या टीपा जरूर वाचाव्यात. )
आपला प्रवास तिमिरातून तेजाकडे, *तमाकडून सत्वाकडे आहे ना !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
19.08.2016
Leave a Reply