MENU
नवीन लेखन...

आहारसार भाग ३

भरपूर जेवल्याने भरपूर ताकद येते हा जसा गैरसमज आहे, तसा कमी जेवल्याने ताकद कमी होते, हा पण गैरसमजच आहे.

विशिष्ट वयात विशिष्ट आजार होणं, हे सर्वसामान्य आहे पण, तरूणांचे अकाली आजार आणि अकाली मृत्यु चटका लावून जातात.

वृद्धत्व आणि मृत्यु लवकर येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. हे चुक नाहीच. वृद्धत्व सुद्धा अनुभवले पाहीजे.

जसजसे वय वाढत जाते, तसतसे भूक आणि झोप आणि सहनशक्ती कमी होत जाते. आणि त्याचा परिणाम प्रतिकारक्षमतेवर दिसतो.
त्यामुळे उतारवयातील भूक आणि पचन कमीच होते.

कोलेस्टेराॅलच्या वाढत्या आणि अवाजवी भीतीमुळे तेलतुपाशिवाय खाण्याचा परिणाम म्हणून शरीरातील ओलावा संपतो आणि वात वाढतो, आणि वयाचा विचार केल्यास उतारवय देखील वाताच्या हद्दीत प्रवेशकर्ते झालेले असते. आता रसनेंद्रियावर, म्हणजे जीभेवर ताबा ठेवावा लागणार, असा काळ.
उत्तर आयुष्य अधिक सुसह्य होण्यासाठी त्याची सुरवात तारूण्यात केली पाहिजे.
ज्या तारूण्यात प्रतिकार क्षमता सर्वोत्तम असते. त्याचवेळी ती युक्तीने आणि संयमाने वापरून घेता आली पाहीजे.

बालपण उतु गेले, तारूण्य नासले, वृद्धपणी देवा आता, दिसे पैलतीर अश्या अवस्थेत मदतीला फक्त औषधेच असतात, हा आणखी मोठा गैरसमज.

यासाठी बालपणापासूनच आपल्या घरातील सर्वांचाच आहार शुद्ध आणि सात्विक असण्याकडे कटाक्ष असला पाहिजे.

आम्ही आमच्या मर्जीचे राजे, मिळवतोय आम्ही, खाणार आम्ही, पचवणार आम्ही, आम्ही आत्ता खाणार नाही तर कधी खाणार, आता या पदार्थांची चटक लागली आहे, आता सुटणे शक्य नाही, तुम्ही कितीही सांगितले तरी आमचे नाॅनव्हेज आता काही बंद होणार नाही, आणि साबुदाणे आम्हाला अतिशय प्रिय आहेत. जे काही व्हायचं ते होऊंदेत, ते आम्ही खाणारच. तुम्हाला वाटलं तर दोन औषधे जास्त द्या. हे आणखी वर !

पण पुढे आजारी पडल्यावर जे भोगावे लागते, ते घरातील सर्वांनाच ना !

आपला आहार आणि आपली प्रतिकारक्षमता यांचा खूप जवळचा संबंध आहे.

मांस हा आहार परंपरेने जरी आला असला तरी जे प्राणी खाल्ले जात आहेत, त्यांनी काय काय खाल्ले आहे, याचाही विचार करायलाच हवा. मांस पचण्यासाठी सुद्धा तरूण वय महत्वाचे असते. बालपणात आणि वृद्धावस्थेत शक्यतो मांसाहार टाळावा.
म्हणजे वय वर्ष वीस एकवीस ते जास्तीत जास्त पन्नाशीपर्यंत पचनशक्ती पिक लेव्हलला असते. वाट्टेल ते खाल्ले तरी ते पचवता येण्याचं हे वय. आणि भविष्यातील आजारांचा पाया याच वयात घातला जातो, हे पण लक्षात ठेवायला हवे.

जसे वय वाढेल तसे आजारही वाढत जाणार असतात. हे समजून घेऊन आपल्या आहारात योग्य तो बदल केला तर वृद्धत्व सुसह्य आणि निरौषधी होईल.

“ज्या वयात, जे आजार व्हायला पाहिजेत, ते झाले, की समजावं, आपण निरोगी आहोत”.
प.पू. गोंदवलेकर महाराजांचे हे वाक्य दवाखान्यात फ्रेम करून लावावे असे आहे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
21.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..