नवीन लेखन...

जेवणाची बैठक कोणती ?भाग ३

पाय आणि मांडी दुमडुन
जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत.

दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे टेबलखुर्ची मध्ये नसते.

टेबलखुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते, तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहाजिकच पोट टेबलाच्याही खाली जाते.(……. आणि पोट दिसतच नसल्याने किती पुढे आले आहे, हे पण कळत नाही.) त्यामुळे टेबलावरील वाढलेले ताट आणि टेबलाखाली वाढलेले पोट यातील अंतर कमी होते. ताटातील घास अंगावर सांडण्याची भीती बिलकुल असत नाही.

टेबलावर वाढलेले ताट आणि उघडलेले तोंड, यामधे फक्त काही इंचाचे अंतर उरते. ताटातील घास अगदी सहजपणे, विनासायास तोंडात जातो.

पण जेव्हा मांडी दुडली जाते, तेव्हा मात्र ताटातील घास अंगावर सांडू नये म्हणून, ताटापर्यंत पुढे वाकावेच लागते. जेवत असतानाच पोट हलते, दुडते, थोडेफार चिरडते, चेपले जाते, यामुळे आतड्यातील आतील भिंतीला चिकटलेले अन्न सुद्धा घसरते, हलते, खाली पडते.

अशा तर्‍हेने आतड्याच्या भिंतीवरून खाली पडलेले अन्न, पचनाच्या, घुसळण्याच्या प्रक्रियेमधे आणले जाते.

अन्न पोटात जात असताना अन्नाचा एक थर पोटात गेला आहे. मधे मधे पाणी पडत, पुनः अन्न. असे थरावर थर रचले जातात. जेवायला मधेमधे पुढे वाकल्याने पोट थोडे आवळले जाते. पोटातील अतिरिक्त वायु बाहेर पडतो. अन्न आणि पाणी यांचे पोटातील संचरण योग्य प्रमाणात होते. पुढे अन्न घुसळायला याची मदत होते.

पुढे वाकून जेवल्याने उजव्या बाजुला असलेले यकृत आणि डाव्या बाजूला असलेले, स्वादुपिंड, अग्न्याशय हे अवयव पण हलकेच दाबले जातात. या ग्रंथींवर थोडासा दाब निर्माण झाल्याने त्या ग्रंथीच्या आतील पाचकस्राव आणि इन्शुलीन, सहजपणे ग्रंथीच्या बाहेर पाझरतात, पचन आपोआपच सुधारते. आंबा पिळल्यानंतर कसा रस गळतो !!

पुढे वाकून जेवल्याचे असे काही फायदे लक्षात आले आहेत.

……आणि अन्नासमोर नतमस्तक होण्यात लाज ती कसली ?
कोणाही समोर जर आपण केव्हाही नतमस्तक झालो तर समोरून आशीर्वादाचा हात सहजपणे वर उचलला जातो.

आणि इथे तर समोर, साक्षात अग्निनारायण.! जेवताना जर त्यांच्यासमोर नतमस्तक झालो, तर अग्निनारायणांना “तथास्तु” म्हणावेच लागेल. नाही का ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
19.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..