नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १

जीवन म्हणजे पाणी.
आजपासून पाण्यावर चर्चा सुरू करू. कारण पाणी कसे प्यावे, किती प्यावे, यामधे बरीच मतमतांतरे आढळतात. ग्रंथामधे जे संदर्भ आले आहेत, त्या अनुषंगानेच माहिती पुरवली जाईल.

जे व्यवहारात दिसते आणि ग्रंथात आहे, त्यानाच आपण आधार मानूया.
ग्रंथ कोणते ?
आयुर्वेदाचे सर्वाना सहज समजतील, असे ग्रंथ म्हणजे अष्टांग संग्रह आणि अष्टांग ह्रदय. म्हणून आपण हे ग्रंथ आधारभूत धरून, पाणी या विषयी माहिती करून घेऊया.

अभ्यास करताना, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे, कोणताही अभिनिवेश किंवा अहंकार बाजुला ठेवून, ग्रंथातील सूत्रांचा आजच्या काळानुसार, अभ्यास करायचा.
मला वाटते या म्हणण्याला काही अर्थ नाही.
हे वचन पण अष्टांगह्रदयकार वाग्भटजीचे आहे.
(रागादिरोगान सततानुषक्तान…..
राग आदि मानसिक रोग देखील बाजूला काढून ठेवून ग्रंथ अभ्यासाला सुरवात करूया.)

पाणी हेच जीवन आहे, कारण पाण्यापासूनच पृथ्वी महाभूताच्या सहाय्याने जीव सृष्टी उत्पन्न झालेली आहे. पृथ्वीचे दोन कण एकमेकांना जोडण्यात जल महाभूत मदत करते. आणि हेच दोन कण वेगळे करताना वायु महामूत मदत करते. गर्भाची वाढ करताना या महाभूतांचे हेच दोन्ही गुण उपयुक्त होतात.एका पेशीच्या दोन पेशी बनवणे, दोनाच्या चार, चाराच्या आठ करणे, आणि या पेशींना उर्जा पुरवण्याचे काम अग्नितत्व करते. आकाश महाभूतामुळे पेशींना विशिष्ट पोकळी आणि आकार प्राप्त होतो.
या पाचही महाभूतांच्या परस्पर संबंधामुळे, कमी जास्त असण्यामुळे, जीवनाची निर्मिती, स्थिती आणि लय होत असतो.

माती पासून मडके बनवायचे असेल तरीदेखील हीच पाच महाभूते काम करत असतात. त्यातील एक जल महाभूत.
निसर्गातील आणि शरीरातील हे जल महाभूत परस्पर पूरक काम करीत असते. पिंडी ते ब्रह्मांडी. जे काम बाहेर चाललेले असते, तेच काम शरीरात चाललेले असते. तीच पाच महाभूते आतही तसेच काम करीत असतात.

या महाभूतांचे गुण काही वेळा एकमेकांना पूरक असतात, तर काही वेळा परस्परांच्या विरूध्द असतात. जसं जल महाभूत हे अग्निच्या गुणाच्या विरूद्ध आहे. एक शीत तर दुसरे उष्ण.
शीत गुण कमी करायचा असेल तर उष्ण गुण वाढवावा लागेल, आणि उष्ण गुण कमी करायचा असेल तर शीत गुण वाढवावा लागेल. असेच शरीरात चालते.

पाणी हे शीत गुणांनी कफ आणि वात वाढवणारे आहे. तर पित्ताला शांत करणारे आहे. पण पाणी शरीरात गेल्यानंतर, पचन पूर्ण झाल्यावर त्याचा विपाक अम्ल बनतो, म्हणून ते नंतर पित्ताला वाढवणारे बनते. हे पण लक्षात ठेवावे. (विपाक ही संकल्पना नंतर अधिक सविस्तर कधीतरी लिहेन.)

हे जलमहाभूत पाणी या पदार्थातून आपण नियमितपणे वापरत असतो. या पाण्याचे सर्व गुण आणि कर्मे आपण समजून घेऊया.

जगण्यासाठी पाणी आवश्यक आहेच. घर बांधण्यासाठी पाणी आवश्यक आहेच. पण, अति प्रमाणातील पाणी देखील मृत्युचे कारण बनते, हे लक्षात ठेवूया.
उत्तराखंडमधे आलेला जलप्रलय, कष्टाने बांधलेली घरेच्या घरे, काही क्षणातच, उद्ध्वस्त करून गेलाय, हे पण लक्षात ठेवूया.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..