पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे (Lower Back Pain), पाठीवर ताण येणे किंवा पाठीला अस्वस्थ वाटणे होय. पाठदुखीमधे पाठीचा कणा किंवा स्नायू दुखावतात. ही व्याधी ब-याचदा मानसिक ताणामुळे सुरू होते. पाठीच्या कण्याजवळ जे मोठे स्नायू असतात ज्याचा पाठीच्या कण्याला आधार असतो ते दुखावल्या मुळे किंवा त्यावर ताण आल्याने पाठदुखी होते. खरोखरच दुखापत झाली असेल तर ती मात्र मानसिक ताणामुळे नसते.
पाठदुखीची व ताणाची कारणे आणि धोके:
ताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच पोझ मध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. जसे की नोकरीच्या ठिकाणी खुर्चीत दिवसभर बसावे लागते. पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. आणि ब-याचदा मानसिक ताणामुळे पाठदुखी सुरू होते.
अशी काहीवेळा गंभीर स्थिती असते जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारिरीक असते आणि भयंकर वेदना देणारी असते; तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि गरज लागल्यास हॉस्पिटलमधे ऍडमिट होणे जरुरीचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या वहान अपघातात मार बसल्याने पाठीची वेदना होते, मार बसतो तेव्हा तात्काळ मदत लागते. तसेच अतीताण घेऊन खूपच जास्त वजन उचलले तरीही पाठीला फ़्रॅक्चर होऊ शकते आणि त्याचे नंतर रुपांतर पाठदुखीत होते. पाठीमधे गाठ झाली, ट्युमर झाला, किंवा कसला संसर्ग झाला तरीही पाठदुखी ही असतेच. कर्करोग, ताप, संसर्ग, वजन उतरणे, अशक्तपणा ह्या सर्व समस्यांमुळे होणा-या पाठदुखी बद्दल आपण आपल्या डॉक्टरांना किंवा फिजिशियनना सांगणे अत्यंत गरजेचे असते.
सर्वसाधारणपणे आढळणारी खालच्या बाजूची पाठदुखी ही २० ते ४० या वयोगटात आढळते. हे दुखणे पाठ, खालची बाजू किंवा मांड्या ह्या ठिकाणी होते. अशा प्रकारचे दुखणे बरे व्हायला ४ ते ५ आठवडे लागतात. अशा ठिकाणी जखम झाली तर त्यावरचा अतीताण जायला १२ ते ३६ तास लागतात.
पाठदुखीसाठी घ्यावयाची काळजी
खालच्या बाजूची पाठदुखी (Lower Back Pain) सुरू असेल आणि त्यावर आपण काहीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे रुपांतर भयानक होऊ शकते. त्यामुळे पुढचे दुखणे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे अत्यंतिक गरजेचे असते. त्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते व्यायाम शिकणे आणि ते नियमित करणे, गरज भासल्यास वजन कमी करणे, काही वजन उचलायचे असल्यास ते योग्य त-हेने उचलणे, झोपण्याची किंवा शारिरीक हलचालींची व्यवस्थित पोझ घेणे, ह्या गोष्टी तज्ञांच्या सल्ल्याने पाळणे आवश्यक असते.
उपचार
पाठदुखीची लक्षणे जर दुखणे विकोपाला नेणारी असतील तर तत्काळ उपचार सुरू करावा. बरेच जण पाठ दुखत असेल तर झोपून रहातात, पण तसे कधीच करू नये. खरे तर ती सर्वात चुकीची पद्धत आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामधे पाठदुखी बद्दलचे प्रशिक्षण आणि सर्वांगिण माहितीसुद्धा अंतर्भूत असते. त्यामधे ही व्याधी वाढू न देण्यासाठी आणि कमी होण्यासाठी काय काय करावे हे डॉक्टर सांगतात. मानसिक ताणामुळे आलेल्या पाठदुखीची काळजी आणि दुखापतीमुळे झालेल्या पाठदुखीची काळजी ही वेगळी असते; त्यामुळे त्याची गल्लत करू नये. कोल्ड कॉम्प्रेसचा उपभोग दिवसातून अधून मधून २० ते ३० मिनिटे घ्यावा. त्याचा खूपच उपयोग होतो
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply