नवीन लेखन...

शिंका येणे

सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे.

ऍलर्जीमुळे “सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो?

सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला ओलावा आणण्यास “सायनसेस‘ एक ते दीड लिटर स्राव तयार करतात; परंतु सायनसची वाट किंवा तोंड (नाकात सूज आल्यामुळे) बंद झाल्यास सायनसमधील स्राव बाहेर पडू शकत नाही. स्राव साठल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन सायनसचे “इन्फेक्शसन‘ होते. ही सूज मूलतः ऍलर्जीमुळे येते, त्यामुळे डोके दुखणे, चेहेरा व डोके जड होणे, थकवा येणे, दिवसभर निरुत्साही वाटणे, कामावरील तसेच अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व शारीरिक चलनवलन कमी होणे ही लक्षणे आढळतात.

अनेक वर्षांचा त्रास असल्यास त्याचे परिवर्तन परत परत होणाऱ्या अथवा ऱ्हिनोसायन सिटीस मध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये सर्दी दाटून पोलिप तयार होतात व सर्व प्रकारचे वास येणे बंद होते, औषधांमुळे सायनस इन्फेक्श न दूर न झाल्यास दुर्बिणीद्वारा अगदी अलगदपणे ही सायनसची तोंडे उघडता येतात; पण काही कालावधीनंतर ऍलर्जीचा कायम स्वरूपी उपचार न केल्याने ती पुन्हा बंद होऊ शकतात. सर्दीच्या योग्य उपायांमुळे सायनस मोकळे राहते व परत परत सायनसच्या इन्फेक्शतनची शक्यचता कमी होते.

ऍलर्जी म्हणजे काय?

प्रतिकारशक्तीचे मुख्य काम म्हणजे विविध जंतूविरुद्ध शरीराचे संरक्षण करणे. याकरिता आपल्या प्रतिकारशक्तीने शरीराला धोका निर्माण करणाऱ्या व धोका न निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. ऍलर्जी म्हणजे निसर्गामधील घटकांना शरीराने दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद होय. हा असा प्रतिसाद शरीराला घातक ठरू शकतो. कारण या घटकांना प्रतिपिंड (antibody) तयार होऊन हिस्टामाईन नावाचे द्रव्य तयार होते.

ते कसे शोधून काढायचे?

तपासणीसाठी त्वचा सर्वांत उपयोगी पडते. ऍलर्जीची औषधे चालू नसल्यास त्वचेची चाचणी रक्ताच्या तापसणीपेक्षा चांगले निष्कर्ष देते. ऍलर्जी वरील कायमस्वरूपी उपचाराला “इम्युनोथेरपी‘ असे म्हणतात.

इम्युनोथेरपी म्हणजे काय?

या उपायांमध्ये ऍलर्जीच्या प्रतिपिंडांना प्रतिबंध केला जातो. हिस्टामाईन हे द्रव्य ऍलर्जीचे माध्यम समजले जाते. हिस्टामाईन विरुद्ध काम करणारी औषधे फक्त ऍलर्जीची लक्षणे थांबवतात. ऍलर्जी होण्याकरता झालेल्या परिणामांचा प्रादुर्भाव थांबवू शकत नाहीत.

इम्युनोथेरपीमध्ये ऍलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते. मग शरीराचा बाह्य ऍलर्जीनिक द्रव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक ते पाच वर्षे ज्या रुग्णांनी हा उपचार केलेला आहे, त्या रुग्णांमध्ये याचे दीर्घकाळ फायदे आढळून येतात. प्रत्येक रुग्णामध्ये हा उपाय पूर्णतः लागू होईलच असे नाही; पण हा उपचार केल्यास ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी होतो किंवा औषधाची गरज कमी भासते. जे रुग्ण ठराविक द्रव्याची ऍलर्जी असूनसुद्धा त्यांना टाळू शकत नाहीत किंवा ज्यांना औषध घेऊनसुद्धा ऍलर्जीचा त्रास होत आहे. त्यांनी हा उपचार अवलंबावा यामुळे ते दैनंदिन जीवन सुखाने जगू शकतील. खाद्य पदार्थांच्या किंवा औषधांच्या ऍलर्जीसाठी मात्र हा उपाय अतिशय अवघड आहे. ऍलर्जीवर काम करणारा प्रतिबंधात्मक उपाय हा विशष उपचार केंद्रात (स्पेशल क्लिननिक)मध्ये केला जातो. नाक, सायनस, श्वारसनलिकेच्या ऍलर्जीमध्ये हा नक्कीच उपयोगी ठरतो. जिभेच्या खाली याची लस देता येते. हळूहळू लसीचे प्रमाण वाढवले की ऍलर्जीचा त्रास कमी होतो. त्रास देणारी द्रव्ये शरीरात असूनसुद्धा प्रतिपिंड निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ (antigen) व प्रतिपिंड यांचा त्रास होत नाही. हिस्टामिन हे द्रव्य तयार न झाल्याने ऍलर्जीचे परिणाम दिसत नाहीत.

संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ:- सकाळ / डॉ. विनया चितळे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on शिंका येणे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..