आता पुढील गट आहे तैल बियांचा.ह्या गटात ज्या घटकांपासून तेल काढले जाते अशा द्रव्यांचा समावेश केलेला आहे.
तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान असलेल्या तीळा बद्दल माहिती पाहूया.
तीळ चवीला गोड,तुरट,तिखट,कडू असून तीळ उष्ण असतात.ते स्निग्ध,पचायला जड असून वातनाशक व कफ पित्त वाढविंणारे असतात.
तीळ हे दातांना बळकट करतात,बाळंतीण स्त्रीचे दुध वाढवतात व शुक्रवर्धक,बुद्धिवर्धक,केसांचे व हाडांची बळकटी वाढविणारे असतात.
आता तीळापासून तयार केल्या जाणाऱ्या व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)चिक्की,तीळगुळ,तिळाचे लाडू:
चवीलागोड,पचायलाजड,स्निग्ध,बल्य,
बुद्धिवर्धक,वातनाशक,पित्तनाशक,कफकर,उष्ण,धातुपोषक आहे.
२)तिळाची चटणी:
तिखट,गोड,स्निग्ध,पचायलाजड,बलकारक,
उष्ण,भुक वाढविणारी,रूचकर,पाचक,जखम भरायला मदत करणारे,पित्तकर,वात कफनाशक,लघ्वीचे प्रमाण कमी करणारी,मल बांधून ठेवणारी आहे.
३)गुळपोळी:
चवीला गोड,तुरट,पचायला जड,वात पित्तनाशक,
कफकर,स्निग्ध,बाळंतीणीचे दुध वाढविणारी,शुक्रधातू वाढविणारी,बुद्धि व कांती वाढविणारी आहे.
४)तिळ तेल:
चवीला गोड,तुरट,कडू,उष्ण,वातकफनाशक,पित्तकर,मेदकमी करायला सहाय्यक,केस व दातांना हितकर,
बलकारक,जड,त्वचेची कांती वाढविते.
तिळ अति मात्रेत सेवन केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply