शेंगदाण्यांचा वापर आपण पुष्कळ वेळेस करतो टाईमपास म्हणून खारे किंवा भाजून खातो,पोहे,खिचडीतघालतो,चटणी,आमटी,
लाडू,चिक्की,तेल अशा विविध प्रकारे आपण हे वापरतो.
शेंगदाणे किंवा भुईमूग हे प्रामुख्याने घाटावर घेतले जाणारे पिक.हे जमीनीखाली शेंगामध्ये तयार होतात.
शेंगदाणे चवीला गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध वात कफ नाशक व पित्तकर असतात.हे दातांना बळकटी देतात.जखम भरायला मदत करतात.त्वचाविकारात उपयुक्त असून बलकारक,पोषक आहेत.
आता आपण शेंगदाण्याच्या विविध व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहू:
१)शेंगदाणा लाडू/चिक्की:
गोड,उष्ण,पचायलाजड,स्निग्ध,वातनाशक,
कफपित्तकर,बलकारक,अशक्तपणा कमी करणारी,श्रमहर आहे.
२)शेंगदाणा चटणी:
तिखट,गोड,उष्ण,वातनाशक,कफपित्तकर,
पचायला जड,तोंडास रुची उत्पन्न करणारी,भुक वाढविणारी,शुक्रधातू नाशक आहे.
३)खारे शेंगदाणे:
गोड,खारट,उष्ण,वातनाशक,कफ पित्तकर,अम्लपित्त वाढविणारी,पचायला जड,स्निग्ध,रक्तविकार वाढविते.
४)शेंगदाण्याची आमटी:
चवीला गोड,तिखट,उष्ण,वातकफनाशक,
पित्तकर,शुक्रनाशक,भुक वाढविणारी,रुचिकर,पचायला जड,बाळंतीण बाईचे अंगावरचे दुध वाढविते,पौष्टिक आहे.
५)शेंगदाणा तेल:
गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातनाशक,
कफपित्तकर,जखम भरायला मदत करते,त्वचेचा वर्ण सुधारते,संडास व लघ्वी सुटायला मदत करणारी.
६)शेंगदाणा पेंड:
गोड,रूक्ष,वातनाशक,पित्तकफकर,उष्ण,दुध वाढविते,जखम भरणारी,पचायला हल्की.
शेंगदाणे अतिप्रमाणात खाल्ल्याने अम्लपित्त होऊ शकते.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Leave a Reply