प्रा. दिलीप परदेशी यांचा कथा लेखना पासून प्रवास सुरु झाला. प्रा. परदेशी हे विलिंग्डन महाविद्यालयात सुमारे तीन वर्षे प्राध्यापक होते. त्या नंतर त्यांनी प्रदीर्घ काळ पुण्यात फर्गसन् व बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन केले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे आजोबा पैलवान मारुतराव परदेशी सांगलीतील बडे असामी होते. साहित्याच्या वंशपरंपरेपासून दूर असलेल्या परदेशी यांनी मराठी नाटकात स्वतःचीच वाट तयार केली. त्यांनी सुमारे तीसहून अधिक नाटक व एकांकिका लिहिल्या. राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी सांगलीला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीने त्यांची अनेक नाटके राज्य नाट्यस्पर्धेत सादर करताना पुरस्कार पटकावले. त्यांच्या “काळोख देत हुंकार’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत प्रचंड लोकप्रियता मिळवली. एक वर्ष तर असे होते, की त्यावर्षी अंतिम फेरीत महाराष्ट्रातील पाच नाट्य संस्थांनी नाटक सादर केले. चंदू पारखी, रिमा लागू, सदाशिव आमरापूरकर या यशस्वी कलावंताना त्यांच्या नाटकांमधून ब्रेक मिळाला. हिंदी चित्रपट अभिनेते देवानंद यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. त्यांच्या “हम नौजवान’ आणि “सच्चे का बोलबाला’ या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले. “सर्वमान्य नाटककार म्हणून प्रा. परदेशी यांनी महाराष्ट्रात लौकिक मिळवला. विदर्भात त्यांच्या नाटकांचा मोठा रसिकवर्ग होता. ते चांगले कवी होते, म्हणूनच नाटककार होऊ शकले. प्रयोगशीलता, व्यक्तीरेखेतील नेमकेपणा आणि प्रभावी संवाद लेखन ही त्यांच्या नाटकाची वैशिष्ट्ये होती. त्यांची ४५ नाटके व ३०० कविता, ४० कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. महाद्वार, फिनिक्स, मन पिंजर्याचे, काळाजपूर्वा ह्या एकांकिका व स्व्पन एका वाल्याचे, काळोख देते हुंकार,गोष्ट तशी जुनींच पण….,तळहातीच्या नाजूक रेषा,मन धुवाधार, निष्पाप,थेंब थेंब आभाळ, अश्या अनेक प्रोयोगीक व व्यवसाईक रंगभुमीवरील नाटकांनी त्यांना प्रसिध्दी मिळवुन दिली. देवआनंद साहेब व दिलीप परदेशी यांचा विशेष स्नेह होता. देव साहेबांच्या हम नौजवान,व सच्चे का बोलाबाला या चित्रपटांच्या कथा व संवाद लेखन प्रा. दिलीप परदेशी यांनी केले आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटात भूमिका पण केल्या आहेत. शेक्सपियरचे “ज्युलीयस सिझर’ नाटक त्यांना मराठीत वेगळ्या ढंगात आणायचे होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी एका जाहीर समारंभात “मी तुम्हाला उद्याचा वसंत कानेटकर देतो’ अशी शब्दात त्यांची ओळख करून दिली होती. प्रा.दिलीप परदेशी ४ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
सहज दिलीपचे नाव चाळले आणि तुम्ही दिलीप विषयी लिहिलेले वाचून समाधान वाटले. मी त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा एक जवळचा स्नेही. त्याचा लेखन प्रवास, दिग्दर्शन, त्याची धडपड आणि मराठी नाताकाविष्यीची ओढ आणि तळमळ मी जवळून पहिली आहे. त्याच्या १-२ नाटकात मी छोट्याश्या भूमिका केल्या. सांगलीत प्रायोगिक एकांकिका म्हणजे काय हे माहिती नसताना त्या करून लोकांना जागरूक करण्याचे कार्य दिलीपने केले. कित्येक लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी त्याचा स्नेह होता. देवानंद तर त्याला प्रेमाने दिलीपसाब म्हणून बोलावत असे. आपल्या अभ्यासपूर्ण लेखनामुळे दिलीपला न्याय मिळाला असे वाटले म्हणून हे लेखन
आपल्याकडे त्यांचा फोटो मिळू शकेल का ?