नवीन लेखन...

द्वारकानाथ कोटणीस

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली असे आज अभिमानाने सांगितले जाते. वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले, मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर रोडलगतच असलेले“कोटणीस हाऊस” हे डॉ.कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात “काँग्रेस हाऊस”म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या “कोटणीस हाऊस”मध्ये मुक्कामाला येत असत. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते.

डॉ.कोटणीस यांच्या पत्नी डॉ.को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरित्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैनावस्था पाहून त्या सद्-गतीत होत. ही दैनावस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश(चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ.कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात.

१९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दुसर्याय महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना या महायुद्धात जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यात चीनच्या जखमी सैनिकांचे खूप हाल झाले. चीन सरकारच्या विनंतीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मदतीसाठी पाच डॉक्टरांचे मदत पथक पाठविले होते. या मदत पथकाचे प्रमुख होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस. डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.वैद्यकीय क्षेत्रातले त्यांच्या हाताचे कौशल्य मात्र चीनच्या भूमीवर जखमी झालेल्या प्रचंड चीनी सैनिकांच्या शुश्रुषेसाठी उपयोगी पडले. कित्येक सैनिकांना औषधपाणी केले, कित्येकांच्या वेदना दूर केल्या तर अनेकांना मृत्यूच्या दाढेतून त्यांनी आपल्या शल्य कौशल्याने ओढून आणले. हे सर्व करीत असताना सैनिकांना वाचविण्याची पराकाष्ठा, अतिश्रम, दूषित हवामान, खाण्यापिण्याची आबाळ आणि वेळ काळ न पाळल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. परंतु त्याही अवस्थेत स्वतःकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडण्यात कोटणीस गुंतलेले होते. कोटणीसांनी तेथील चिनी नर्सिंग प्रशिक्षिका को चिंग लान यांच्याशी विवाह केला. चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरूपात जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश जाती, धर्म याबंधनाच्या पलीकडे जात मानवतेची खऱ्या अर्थानं पूजा केली असं म्हणनं काही वावगे ठरणार नाही. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी १९४६ साली “डॉ.कोटनीस की अमर कहाणी” हा हिंदी चित्रपट तयार करून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील मानवतावादी कार्याचा साऱ्या भारतवासियांना परिचय करून दिला. हा चित्रपट जगभर गाजला. डॉ. कोटणीसांचा जीवनप्रवास ‘काळी आई’ हा माहितीपट पण अतिशय सुंदर आहे. चिनी भाषेत डॉ. कोटणीसांना काळी आई असे संबोधले जाते. त्यावरूनच माहितीपटाला नाव दिलेले आहे.
देवदूत’ ही डॉ. संजीव शहा यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरील चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत डॉ. कोटणीस यांनी अनंत हालअपेष्टा सोसून तेथील रुग्णांसाठी जे अथक परिश्रम केले, ती कहाणी तशी सर्वश्रुत आहे. या कादंबरीत बरेच तपशील वाचावयास मिळतात. त्याचप्रमाणे डॉ. कोटणीस यांच्या बालपणापासूनचे स्वभावाचे पैलूही कळतात. लेखकाने परिश्रमपूर्वक आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. कॅंटन, चांगशा, हॅंको, वूहान असा या वैद्यकीय पथकाचा खडतर प्रवास. अपुर्याण साधनांनिशी, युद्धाच्या छायेत रुग्णांवर उपचार, ठिकठिकाणी स्वागत, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी हे सारे डोळ्यांपुढे साकार होत जाते. कोमिटांग सरकार आणि कम्युनिस्ट यांच्यातील दुराव्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींचेही चित्रणही येथे येते. औषधाच्या अॅम्प्यूलमध्ये डिस्टिल वॉटर भरण्याचा काळाबाजारही होत होता. भारतीय डॉक्टर आठव्या पलटणीत काम करत होते. ती कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली होती. पुढे माओ, चौ एन लाय यांच्याशी डॉक्टरांच्या गाठीभेटी झाल्या. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले. सामान्य चिनी जनता मोठया जिद्दीने, जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यलढयात उतरलेली पाहून डॉक्टरांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढयासाठी आपल्या या निरीक्षणांचा, अनुभवाचा कसा फायदा करून देता येईल, असे विचार येत. ते तेथील नेत्यांशी चर्चा करीत. दुर्दैवाने डॉक्टरांचा चीनमध्येच मृत्यू झाला.

४ नोव्हेंबर १९३९ ला डॉ. कोटणीस, डॉ. अतल, डॉ. बसू हे येनानकडून सिआन मार्गे च्यू तेह यांच्या आठव्या पलटणीच्या सरसेनापतींच्या प्रमुख ठाण्याकडे निघाले. ते २१ डिसेंबर १९३९ ला मुक्कामाला पोचले. वाटेत बर्फाच्छादित डोंगर, अवघड वळणे या प्रवासाचे वर्णन वाचण्यासारखे आहे. किती प्रतिकूल परिस्थितीत, मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय डॉक्टर रुग्णसेवा करीत होते, ते वाचून मन थक्क होते. नवखा देश, नवखी माणसे, हवामान प्रतिकूल, मृत्यूची सदैव छाया, सुरवातीला भाषेची अडचण या सगळ्या परिस्थितीत गनिमी काव्याने जखमी सैनिकांवर उपचार करणे, शस्त्रक्रया करणे हे केवढे मोठे आव्हान होते! डॉ. कोटणीस दुसरे बेथ्यून झाले. त्यांना काळी ई हा प्रेमाचा किताब मिळाला. को चिंग लान ही ध्येयवादी, प्रेमळ, समविचारी पत्नी मिळाली. पण तिला छोटया इंग व्हा या आपल्या मुलाला सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला. डॉ. कोटणीस यांचा ध्येयवेडा, शिस्तप्रिय पण प्रेमळ स्वभाव, समर्पण वृत्ती विविध प्रसंगांतून मनावर ठसते. हे यश लेखकाचे आहे. पुस्तकात छान छायाचित्रेही आहेत. त्यातून हा इतिहास मनात जागा होण्यास मदत होते. सरळ साध्या शैलीतील ही कादंबरी वाचनीय आहे. मा.डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..