येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद बल्लाळ (संपादक दै. ठाणे वैभव) , दीपक वेलणकर (व्हॉईस गुरु) ही नामवंत व्यक्तिमत्व लाभलेली आहेत. आपण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती !
श्रोते हो, आपण माझ्या लिखाणाला देत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मला सतत लिहीत रहाण्याची उर्जा मिळते. तीच विचारांची मालिका आणि तंत्रज्ञानाची कास धरुन निर्माण झालेलं त्याचं हे श्राव्यरुप मी खास आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझा हा खारीचा वाटा ! आजच्या विद्यार्थी वर्गाला मराठी भाषा वाचन आणि उच्चार सुधारण्यासाठी मदतीचा हात देण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझा हा वेगळा प्रयत्न आहे. आपण माझी ही नवनिर्मिती स्विकारुन, नक्कीच प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा !
घेऊन तेव्हा येईन मी, विचारांचे नवीन रंग !
द्याल जेव्हा साद मित्र हो, पुन्हा उमटतील मनतरंग !
मनापासून धन्यवाद !
– नूतन बांदेकर
Leave a Reply