शिल्पा शिरोडकरची बहीण नम्रता, शिल्पा व नम्रताची आजी मीनाक्षी शिरोडकर- त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्क्रीनवर स्वीमिंग सूट घालून मराठी समाजाला चांगलंच हादरवलं होतं. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी झाला.
सर्वसामान्य स्त्रिया बिकिनीला सरावल्या नसल्या, तरी भारतीय चित्रपटात मात्र बिकिनीचं मुबलक दर्शन घडलं आहे. सर्वप्रथम स्वीमसूट परिधान करण्याचा मान जातो नम्रता शिरोडकरची आजी मीनाक्षी शिरोडकर यांना. त्यांनी ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटात ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हय्या’ ह्या गाण्यात परिधान केलेला स्वीमसूट रुढार्थाने बिकिनी नसला, तरी त्याने तत्कालीन संस्कृतिरक्षकांच्या मेंदूला झिंझण्या आणल्या होत्या. १९९३ मध्ये तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.शिवाय मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर राहिली होती. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर काही वर्षे नम्रताने मॉडेलिंग केले आणि नंतर सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. १९९८ मध्ये नम्रताने सलमान खानसोबत’जब प्यार किसीसे होता है’या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती.या सिनेमात तिने छोटेखानी भूमिका साकरली होती.विशेष म्हणजे या सिनेमापूर्वी नम्रताने ‘पूरब की लैला पश्चिम की छैला’हा सिनेमा साइन केला होता.मात्र आजपर्यंत हा सिनेमा रिलीज झालेला नाही.तिच्या यशस्वी सिनेमांच्या यादीत पुकार,वास्तव,हेरा फेरी,अस्तित्व,कच्चे धागे,तेरा मेरा साथ रहे,LOC कारगिल या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडमध्ये अपयश पदरी पडत असल्याचे बघून नम्रताने लग्न करुन इंडस्ट्रीला रामराम ठोकला.२००५ मध्ये दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबूसोबत नम्रताने लग्न केले.२००० मध्ये’वामसी’या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिची भेट महेश बाबूसोबत झाली होती.काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने साडे तीन वर्षे लहान आहे. नम्रता सध्या बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून दूर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply