नवीन लेखन...

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  ।
अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।

शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  ।
ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।।

पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  ।
शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।

देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  ।
समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।।

शोधामध्यें चिंतन करतां,   ध्यान परी लागते  ।
समाधी स्थितीत येतां प्राण,   अनंतात मिसळते  ।।

नाही दिसले रुप ईश्वरीं,   आगळे एकटे  ।
विश्वमंडळ तोच असतां,   शोधू तयास कोठे ?  ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..