हल्ली जीवनशैली कमालीची व्यस्त बनली आहे. सतत धावपळ हा आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी काही अपघात घडतात. यामध्ये एक म्हणजे पाय मुरगळणे. काही वेळा चालताना, पायर्या उतरताना पाऊल किंचित तिरके पडते आणि पाय मुरगळतो. पाय मुरगळतो तेव्हा पायातील सांध्यांच्या दोन हाडांना जोडणार्याि उती अर्धवट फाटतात किंवा काही वेळा पूर्णही फाटतात. असे झाले तर पायाच्या घोट्याजवळ सूज येते. सूज आली असता त्या भागावर बर्फाने शेक द्यावा. बर्फाने शेकण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. बर्फाचे खडे जाडसर पिशवीत घेऊन त्यात थोडे मीठ घालावे. पिशवीला गाठ मारावी आणि दुखत असणार्याख जागेवर ही पिशवी काही वेळ ठेवावी. वेदना तीव्र होईपर्यंत ही पिशवी तशीच ठेवावी. नंतर पुन्हा ती दुसर्याे जागेवर ठेवावी. अशा प्रकारे सलग 15 मिनिटे बर्फाने शेकावे. दिवसातून साधारणपणे दोन वेळा बर्फाचा शेक द्यावा. मुरगळल्यानंतर पायाला पूर्ण विश्रांती द्यावी. पाय शक्यतो उशांवर ठेवावा. बाजारामध्ये पायाला बांधण्यासाठीचे बँडेज मिळते. ते पायाच्या बोटांपर्यंत बांधावे जेणेकरून पायांच्या स्नायूंना आधार मिळतो आणि सूज लवकर कमी होण्यास मदत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संजय गायकवाड
Leave a Reply