हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला.नलिनी जयवंत यांचे शिक्षण प्रार्थना समाजाच्या राममोहन शाळेत झाले. लहानपणी नलिनी जयवंत यांचा डान्स हे राममोहन शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण असे. नामांकित लोक तो पाहायला येत. तिच्या या डान्सला भाळूनच मा.वीरेन्द्र देसाईंनी केवळ चौदा वर्षांच्या नलिनीला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. नलिनी आणि विजया जयवंत (मेहता) विद्यार्थी भवनमध्ये राहात होत्या. “राधिका’ या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले. दिलीपकुमार, नर्गीस यांच्यासोबत “अनोखा प्यार’मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली होती. नलिनी यांनी निर्देशक वीरेन्द्र देसाई यांच्या बरोबर १९४० मध्ये विवाह केला.
हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत यांनी १९४१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या नंतर त्यांच्या कारकिर्दीला ‘अनोखा प्यार’ (१९४८) चित्रपटापासून वेग आला. १९६५ सालचा ‘बॉम्बे रेस’ हा प्रमुख भूमिका असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. मा.अशोककुमार यांच्या सोबत केलेले “समाधी’, “सरगम”, “मिस्टर एक्सु’, “काफिला’, “मुकद्दर’ हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. देवानंदसोबत केलेल्या “कालापानी’ या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. “कालापानी’ या चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या उत्कृष्ट सहअभिनेत्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बहन ,जलपरी, शिकस्त, जादू, महबूबा, राजकन्या, रेल्वे प्लॅटफॉर्म, सलोनी, बॉम्बे रेसकोर्स या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यावेळच्या हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीच्या नायिकामध्ये त्यांची गणना होत होती. फिल्मफेअरनेच १९५० मध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात त्याकाळात हिंदी सिनेसृष्टीत असलेल्या सर्वात सुंदर नायिकेचा मान दिला होता. १९८३ मध्ये ‘नास्तिक’ चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत त्यांचे रूपेरी पडद्यावर अखेरचे दर्शन झाले. मा.नलिनी जयवंत यांच्याशी अशोक कुमार यांचे संबंध असल्याचे सांगण्यात येत असे. १९५० साली हे दोघे एका चित्रपटात काम करीत असताना या अफवांना अधिक ऊत आला होता. अर्थात मधुबाला यांच्याप्रमाणेच चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर या दोघांमधील अंतर वाढले. त्याच काळात त्यांच्या भूमिकांमुळे ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. नलिनी जयवंत यांचे निधन २० डिसेंबर २०१० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply