सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी झाला. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. वयाच्या १२ वर्षापासून चित्रपटांत काम करणाऱ्या मा.ललिता पवार यांची विक्रमी सिनेकारकीर्द एकूण ७० वर्षांची आहे. त्यांनी सुमारे ७०० चित्रपटांत भूमिका केल्या. ललिता पवार यांनी आपल्या भूमिकांतून सिनेरसिकांना अत्यंत प्रखर अशा सासू किंवा आई व खलनायिकेचे दर्शन घडविलेले आहे. त्यांची सासूची व आईची भूमिका चिरस्मरणात राहात आलेली आहे. विशेष म्हणजे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेत त्यांनी साकार केलेली ‘मंथरा’ ही अविस्मरणीय भूमिका प्रेक्षकांच्या चिरस्मरणात आहे. मा.ललिता पवार ह्या बॉलीवुड मधील पहिली अभिनेत्री की ज्यांनी १९३५ साली आलेल्या हिंमते मर्द या चित्रपटात बिकिनी घातली होती. हृषीकेश मुखर्जीच्या ‘अनाडी’मध्ये त्यांनी साकार केलेली ‘मिसेस डिसा’ म्हणजे त्यांच्या अभिनयाचा कळस होता. १९४३ मध्ये मराठी नाटय़संमेलन पार पडले, त्यामध्ये मा.लता मंगेशकर यांनी मास्टर दीनानाथ यांची दोन नाटय़पदे गाऊन सर्वाची वाहवा मिळवली, मा.ललिता पवारांनी लताचे जाहीर कौतुक करून त्यांना दोन सोन्याच्या कुडय़ा भेट दिल्या. व लता मंगेशकर यांच्या आयुष्यातला पहिला जाहीर सत्कार मा.ललिता पवार यांनी केला होता. २४ फेब्रुवारी १९९८ ललिता पवार यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply