नवीन लेखन...

कोलंबस

अमेरिकेचा शोध लावल्यानंतर कोलंबस मायदेशी परतला.राणीनं त्याचं भव्य स्वागत केलं. राजदरबारात त्याच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केला.

काही दरबारी कोलंबसचे घोर विरोधक होते. त्यांना अर्थातच हे आवडलं नाही.
समारंभ सुरू असताना त्यांच्यापैकी काही म्हणाले, ‘कोलंबसने काही खास कामगिरी बजावलीय असं आम्हाला वाटत नाही. पृथ्वी गोल आहे. कुणीही जरी गेलं असतं तरी त्याला अमेरिका मिळाली असतीच.’ बराच वेळ कोलंबस त्यांचे टोमणे ऐकत राहिला.

शेवटी समोरच्या थाळीत खाण्यासाठी ठेवलेल्या उकडलेल्या अंड्यांपैकी एक अंडं उचललं आणि तो म्हणाला, ‘आपल्यापैकी कुणी हे अंडं टेबलावर सरळ उभं करून दाखवू शकेल का?’

कोलंबसने विचारल्यावर त्याच्या सगळ्या विरोधकांनी अंडं टेबलावर सरळ उभं करणं एक आव्हान समजून स्वीकारलं. पटापट थाळीतील अंडी उचलून ते प्रयत्नाला लागले.

पण कुणालाही अंडं टेबलावर उभं करता येईना.
शेवटी ते म्हणाले, “अंडं टेबलावर सरळ उभं राहूच शकत नाही.”

हसतच कोलंबसनं एक अंडं उचललं आणि जोरात टेबलावर आपटलं. त्यामुळे अंड्याच्या बुडाकडचा भाग चेपला आणि अंडं सरळ उभं राहिलं.
कोलंबस म्हणाला, “पाहा, मी अंडं उभं केलं.”

यावर सगळेच दरबारी गलका करत म्हणू लागले, ‘तू अंडं चेपवलंस. असं तर कुणीही अंडं उभं करू शकेल.’

कोलंबस म्हणाला, “पण कुणी केलं का? एकदा कुणी करून दाखवल्यानंतर करणं सोपं असतं. पहिल्यांदा कोण करतं यालाच महत्व असतं.”

— दीपक गायकवाड

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..