नवीन लेखन...

आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – १

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत.

जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची सुसूत्रता आहे. मानवाचा मेंदू विचार करू लागला तसा, केलेल्या निरीक्षणांचे, त्याच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि आधी घेतलेल्या अनुभवांच्या बळावर, स्पष्टीकरणेही देअू लागला.

पहिला विचार कोणता आला असेल तर तो हा की, हा निसर्ग कुणीतरी शक्तिमान व्यक्तीनं निर्माण केला असावा आणि त्याचं नियंत्रणही तोच अतिशय हुशारीनं करीत आहे. ….ती व्यक्ती म्हणजेच अीश्वर ही संकल्पना रूढ झाली आणि हजारो वर्षांपासून आजही मानवाचं श्रद्धा आणि पूजास्थान आहे. ही श्रद्धाच त्याला जीवनभर तारते आहे, मार्ग दाखविते आहे.

दुसरा महत्वाचा विचार म्हणजे सजीवांच्या शरीरात कोणतीतरी दिव्य चेतना असली पाहिजे. जोपर्यंत त्याच्या शरीरात ही चेतना जागृत असते, कार्यक्षम असते तोपर्यंत तो सजीव त्याचे सर्व व्यवहार … म्हणजे आहार .. अन्न मिळविणं, त्यासाठी भटकंती, संघर्ष, आक्रमण किंवा प्रतिकार करणं, प्रजोत्पादन करणं वगैरे सुरळीतपणं करता येतात. जेव्हा ही चेतना त्या सजीवाच्या शरीरातून निघून जाते तेव्हा तो सजीव अचेतन होतो, मरतो. याच चेतनेला त्यानं नाव दिलं … आत्मा.

अीश्वर आणि आत्मा या दोन संकल्पना, मानवाचा मेंदू विचार करू लागला तेव्हापासून रूढ झाल्या आहेत. पुढे अनेक धर्म स्थापन झाले आणि त्या सर्व धर्मात अीश्वर आणि आत्मा या संकल्पना अग्रभागी राहिल्या.

सोमवार 26 जून 2000 रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि अिंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी संयुक्तपणे, मानवाच्या जनुकीय नकाशाचं काम पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जनुकीय नकाशाचं काम, डॉ. जे. क्रेग व्हेंटर यांनी, खाजगीरित्या पूर्ण केलं. सरकारी यंत्रणेत हे काम 1986 साली, कॅलिफोर्निया विद्यापीठात सुरु होतं आणि ते अेप्रिल 2003 मध्ये पूर्ण झालं.

ही बातमी वाचून माझ्या मेंदूत आनुवंशिक तत्व, सजीवांचा जन्म आणि सजीवांची शरीरं यासंबंधी, तसंच झाडांच्या बिया आणि अंकुरित झाडं या संबंधी विचार घोळू लागले.

या विचारांचा गोषवारा मी लिहिलेल्या पुढील चार लेखात आला आहे. हे लेख, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (सप्टेंबर 2000), शिक्षण संक्रमण पुणे, (ऑक्टोबर 2000), मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (दिवाळी, नोव्हेंबर 2000), किर्लोस्कर (डिसेंबर 2000) प्रसिध्द झाले. नंतर मुंबअी तरूण भारत, (25 जानेवारी 2002), मुंबअी तरूण भारत, (1 फेब्रुवारी 2002), अमृत (मार्च 2002), अमृत (जुलै 2002), असे चार, जास्त माहिती असलेले माझे लेख प्रसिध्द झाले. त्यानंतर मात्र हा विषय थोडा मागे पडला. तरी पण मेंदूत विचार चालूच होते.

त्यानंतर नोव्हेंबर 2008 ते मे 2009 या काळात, मी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातील ओरलॅन्डो शहरी माझ्या मोठ्या मुलीच्या घरी वास्तव्यास होतो. त्याच सुमारास, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरातून श्री. दिवाकर कारखानीस,www.sawali.org हे संकेतस्थळ चालवीत होते. त्यावर मी दोन अध्यात्मिक निबंध लिहीले. अेक “अध्यात्म आधी की विज्ञान आधी अवतरले?” आणि दुसरा “अीश्वराची संकल्पना”.

ओरलॅन्डो शहरात काही भारतीय व्यक्ती, रोज संध्याकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत अेका रेडियो स्टेशनवर, भारतीयांसाठी, माहितीपर, वैचारिक आणि करमणूकप्रधान कार्यक्रम सादर करीत असत. त्यातील अेक संचालिका, शोभना डॅनियल, माझ्या मुलीची (सौ. पालवी जहागिरदार) मैत्रिण होती. शोभनाजवळ, माझी मुलगी, माझ्या अध्यात्मिक लिखाणाबद्दल बोलली. तिला माझे लेखही वाचायला दिले. ते शोभनाला अितके आवडले की तिनं नजिकच्या मंगळवारी, रेडियोवर माझा कार्यक्रम ठेवला. तो अितका रंगला की नंतरचे तीन मंगळवार असे अेकूण चार कार्यक्रम झाले.

चौथा कार्यक्रम चार प्रतिनिधींच्या स्वरूपात झाला. सामान्य माणूस म्हणून स्वत: शोभना, विज्ञानीय दृष्टीकोनातून अध्यात्माकडे पाहणारा मी, ओरलँडो, फ्लॉरिडा येथील, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका येथे, हिंदूधर्म आणि अितर धार्मिक ग्रंथांवर संशोधन करणारे आणि तेथे अध्यापन करणारे, मूळचे न्यू यॉर्क विद्यापीठातील संगणक अभियंता डॉ. अभिनव द्विवेदी आणि अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण पिढीला अध्यात्माबद्दल काय वाटतं याचा प्रतिनिधी म्हणून 16 वर्षांचा अतीश पटेल या चार व्यक्तीत चर्चा झाली. यातील शोभना आणि मी, रेडियो स्टेशनात, अभिनव द्विवेदी, ओरलॅन्डो शहरापासून 150 मैलावरील टांपा शहरात तर अतीश पटेल त्याच्या घरी होता.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने…विज्ञानीय अीश्वर (Science God), आत्मा, आत्म्याचं शरीरातील स्थान, पुनर्जन्म, मागील जन्मातील बरीवाअीट कर्मे आणि त्यांचा वर्तमान जन्मावरील परीणाम, पाप, पुण्य, मोक्ष, जन्ममृत्यूचे फेरे, स्वर्ग, नरक, यम आणि त्याचा मृत्यूफास, जपजाप्य, पोथ्या/मंत्र पठण वगैरे अनेक अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. “आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत” आणि भगवत् गीतेतील काही श्लोकांचा विज्ञानीय अन्वयार्थ लावणं या अुपक्रमाचे बीज
तेथेच रुजलं.

या विश्वात, अमूर्त असं काहीही नसतं, सगळे घटक मूर्त स्वरूपातच असले पाहिजेत. अीश्वर आणि आत्मा हे ही अपवाद नाहीत. त्यापैकी आत्म्याचं मूर्तस्वरूप म्हणजे सजीवांच्या शरीरात असलेलं आनुवंशिक तत्व … जेनेटिक मटेरिअल.

हाच माझा आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत.

गजानन वामनाचार्य, मुंबअी.

शनिवारचा सत्संग  – 1
शनिवार 26 नोव्हेंबर 2016

पूर्वप्रसिध्दी : आपले जग, किर्लोस्करवाडी –
27 फेब्रुवारी 2012

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..