त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षक अशी बहुविधता होती. म्हणूनच नाना क्षेत्रातील नाना प्रकारचे लोक त्यांच्या भोवती असायचे. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. राजकारणाच्या रणधुमाळीत ते अहर्निश उभे होते. त्यामुळे ललित लेखनासाठी फारशी फुरसत त्यांना मिळत नव्हती. तरीही वृत्तपत्रलेखन आणि नाट्यलेखन या दोन्हीमध्ये त्यांचा नावलौकिक मोठा होता. १९१२ साली त्यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बलवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३०च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली. वामनराव जोशी यांचे ३ जून १९५६ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply