नवीन लेखन...

उत्तम निवेदिका अभिनेत्री रेणुका शहाणे

‘सुरभि’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमाने घराघरांत पोचलेले रेणुका शहाणे हे नाव घराघरात पोचले. त्यांचा जन्म २७ मार्च १९६५ रोजी झाला.त्यांचे ते दिलखुलास हसून ‘नमस्कार’ म्हणणे आजही लोकांच्या कानांत आणि डोळ्यांसमोर आहे. या कार्यक्रमातून त्या एक उत्तम निवेदिका दिसल्या तशी त्यापाठोपाठ आलेल्या मालिकांमधून अभिनय निपुणताही प्रेक्षकांनी वाखाणली. भारतीय दूरचित्रवाणीवर गाजलेल्या मालिकांपैकी अनेक रेणुका शहाणे यांच्या नावावर आहेत. सर्कस, सैलाब, इम्तिहान आदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.

मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुका शहाणे यांनी १९९२ मध्ये ‘हाच सुनबाईचा भाऊ’ या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरवात केली. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती १९९३ ते २००१ या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘सुरभी’ या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर १९९४ मध्ये आलेल्या ‘हम आपके है कौन’ या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हम आप के है कौन’मुळे ‘भाभी’ म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘हम आपके है कोन’ नंतर रेणुका या फक्त महेश कोठारे दिग्दर्शित ‘मासूम’ या एकमेव हिंदी चित्रपटातून दिसल्या. रेणुका शहाणे या हिंदी चित्रपटातूनही, बराच काळ झाला तरी दिसल्या नाहीत,याबाबत त्या सांगत म्हणतात, ‘हम आपके है कोन’ चे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे पिताजी राजकुमार बडजात्या यांनी मला त्यावेळी सांगितले की, या एकाच चित्रपटाने तुला अशी ओळख व लोकप्रियता मिळाली आहे, की तू यापुढे जास्त चित्रपटातून भूमिका साकारल्या नाहीस, तरी चालेल. १९९४ सालचा ‘हम आपके है कोन’ आजही झी सिनेमा वाहिनीवर सातत्याने दाखवला जात असून, तो आवर्जून पाहिला जातो. जोपर्यंत आपल्या देशात लग्नसंस्कृती कायम आहे, तोपर्यंत या चित्रपटाबाबतचे आकर्षण असेच कायम राहणार आहे. त्या लोकप्रिय प्रतिमेमध्ये न अडकता रेणुका शहाणे यांनी पुढील भूमिका सावधपणाने निवडल्या. नृत्य, खाद्यपदार्थ आणि विनोदाला वाहिलेल्या रिअॅमलिटी शोमधूनही त्या सहभागी झाल्या. आपली आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या कादंबरीवर आधारित ‘रिटा’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांच्यातील दिग्दर्शिकेशी ओळख झाली. रेणुका शहाणे यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..