१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते.
२) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात.
३) भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा. केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल.
४) मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते.
५) जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे तेल केसांना लावावं.
६) बाजारात मिळणारं जास्वंद तेलही खूप गुणकारी असतं. फक्त पाणी घालून ते थोडं पातळ करून लावा.
७) जास्वंद जेलचा अरोमा थेरपीच्या तेलांमध्येही खूप उपयोग होतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नये.
८) ब्राह्मी, माका, नागरमोथा, जांभळं आणि जास्वंदीची फुलं एकत्र उकळवून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवावं आणि हेअर वॉटर म्हणून वापरावं.
९) मेंदी कालवताना ताक, जास्वंद तेल आणि मंडूर पावडर एकत्र भिजवावी. हे मिश्रण लावल्यामुळे केसांना नैसगिर्क रंग येतो.
१०) जास्वंद जेलमध्ये शिकेकाई, रिठा, कचूर सुगंधी, संत्र्याची साल आणि मुलतानी माती एकत्र करून त्याचा लेप केसांना लावावा.
Leave a Reply