नवीन लेखन...

मालवणचा “सुवर्णगणेश” !

जयंतराव साळगावकर यांनी मालवणमध्ये बांधलेले सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर

गणपती आणि गाणपत्य संप्रदायाचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे कै. जयंतराव साळगावकर ! त्यांनी  हे सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर मालवणमध्ये बांधले आहे.

येथे गणपतीचा थाट पूर्णपणे वैभवशाली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय  आहे. रिद्धी सिध्दीही नेहेमी पाहायला मिळतात त्यापेक्षा वेगळ्या आहेत . गणपतीच्या दोन्ही बाजूंना  मूषक जोडी,  दोन बाजूंना लामणदिवे,अत्यंत देखणी प्रभावळ आणि राजेशाही चौरंग ही आणखी काही  वैशिठ्ये ! गाभारा प्रशस्त आहे. 

मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो.
मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे
आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो.

त्यामानाने मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो. भविष्यात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या अमाप वाढू शकते. त्यादृष्टीने मात्र मोठ्या वाहनांसाठी वाहनथांबा,  शिस्तबद्ध दुकाने, प्रसाधनगृहे, थोडे रुंद रस्ते यांचे नियोजन आत्ताच करायला हवे.  

इतके सुंदर मंदिर आपण अवश्य पाहायला हवे. 
— मकरंद करंदीकर

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on मालवणचा “सुवर्णगणेश” !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..