आज
तुझ्या पुतळयाला त्यांनी
हार घातले.
आम्ही टाळ्या वाजल्या.
निळी निळं ही उधळतं
ते नाचत राहिले.
आम्ही त्यांच्या गुलालात
रंगत राहिलो.
जय भीमचा नारा
दिला त्यांनी
आम्ही मोठ्याने त्यांचे जयजयकार
करत राहिलो.
गावकुसाबाहेर
जंयतीच्या कार्यक्रमात
ते तुझे विचार
घसा फुटूस्तोवर सांगत राहिले.
आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन
तुझ्या राज्यघटनेचं….
लोकशाहीचं चांगलभल
करत राहिलोत….
पोवाडे गात राहिलो
पण….
त्या गुलामगिरीच्या सनातन बेड्या
नाही तोंडू शकलो आम्ही.
आणि ते
झिलमली स्वातंत्र्य नि
समतेचं ते गोड
कबुतर नाही भेटलं अजून…..
परशुराम सोंडगे, पाटोदा (बीड)
9673400928
Leave a Reply