नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग आठ

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक दोन

“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. ” – भाग पाच

शरीर सांगते ते सगळंच अगदी बरोबर असतं असं नाही. याचा अर्थ असाही नाही, की शरीर जे करतंय, ते सर्व माफ आहे ! काही वेळा शरीराचे नियम देखील तारतम्याने घ्यायचे असतात. काही वेळा शरीरावर सोडूनही चालत नाही, अशावेळी त्याने दिलेल्या बुद्धीचा योग्य रितीने वापर करून घ्यायचा असतो.

यासाठी रोग आणि लक्षण यातील फरक समजून घेतला पाहिजे. ज्याचे ज्ञान वैद्याने शिक्षणामधेच घेतलेले असते.

शरीराकडून जसे तहान हे लक्षण निर्माण केले जाते, तसं काही वेळा तहान हा ‘रोग’ म्हणून देखील मधुमेहासारख्या आजारात आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवतो.

उन्हाळ्यात तहान लागणे ही शरीराची गरज आहे. आणि मधुमेहामधे पुरेसे पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नाही. पुनः पुनः भरपूर पाणी प्यावेसे वाटते, हे लक्षण रोगावस्थेचे आहे. म्हणून आपल्याला लागणारी तहान, ही गरज आहे की रोग, हे वैद्याच्या सल्ल्यानुसार ठरवावे.

रक्तपित्त नावाच्या आजारात नाकातून, लघवीवाटे, गुदमार्गाने, योनीमार्गे, रक्त जात असते. रक्तं जीव इति स्थिति. रक्त हा अत्यंत महत्त्वाचा धातु असल्याने त्याची उपेक्षा करू नये. रोगाची अवस्था ओळखून या रक्ताला थांबवणे आवश्यक असते. हे वैद्य कर्तव्य आहे.

अतिसारामधे देखील पाण्यासारखे जुलाब होत असताना, रोगाची साम अवस्था, निराम अवस्था ओळखून पुढील चिकित्सा वैद्यांना ठरवावी लागते.

पार्श्वशूल सारख्या अवस्थेत फुफ्फुसाबाहेर, तर जलोदरामधे पोटामधे पाणी साठत जाते. खरंतर शरीराने संरक्षणात्मक उपाय योजना म्हणून हे पाणी साठवलेले असते, परंतु काही अवस्थेत, हे पाणी इतर रोगांना निमंत्रण देणारे ठरते, त्यामुळे अशा अवस्थेत देखील वैद्य सहाय्य घेणे आवश्यक ठरते.

काहीवेळा “हाऽ भाई हांऽऽ” असे वैतागवणारा सर्दीसारखा आजार देखील नाकातून वाहाणारे पाणी थांबवायला मजबूर करीत असतो.

शरीराची अवस्था, रोगाची तीव्रता, शरीराची प्रतिकारक्षमता, आणि रोगाची गंभीरता या गोष्टींचा विचार. हे तारतम्य बाळगायलाच हवे.

नाहीतर त्याने दिलेल्या बुद्धीचा उपयोग कधी करणार ना ! वापरलं नाही तर लोखंडालासुद्धा गंज चढतो.

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..